computer

निवडणुकीच्या निमित्ताने हा सर्च आहे गुगलवर ट्रेंडीग...तुम्ही पण हेच सर्च करत आहात का ?

मंडळी, कालच निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. त्यानिमित्ताने गुगलवर एक सर्च जोरदार ट्रेंड होतोय. हा सर्च आहे बोटावरची शाई कशी घालवायची याचा. चला तर जाणून घेऊ या सर्च मागे नेमकं काय कारण आहे.

मंडळी, आज सकाळपासूनच हा सर्च ट्रेंडीग मध्ये आहे अशी बातमी येत आहे. लोक ‘How to remove vote ink’ हा सर्च मोठ्या प्रमाणात करत आहेत. आज सकाळपासूनच या सर्चचं प्रमाण सर्वाधिक वाढलंय. याखेरीज ‘election ink’  आणि ‘vote ink’ हे शब्द पण सर्वात जास्त सर्च केले जात आहेत. ‘गुगल ट्रेंड’ने दिलेल्या माहिती नुसार हा सर्च मागच्या दोन दिवसापासून वाढलाय.

मतदानाची शाई ट्रेंडींग मध्ये का आहे ?

मंडळी, बोभाटाने यावर थोडी शोधाशोध करून माहिती मिळवली आहे. ती अशी की, काल उत्तर प्रदेशच्या काही मतदान केंद्रांवर बोटावरची शाई सहज पुसली जाण्याची घटना घडली होती. निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार पण करण्यात आली होती. याच बातमीच्या निमित्ताने मतदानाची शाई सर्वाधिक सर्च करण्यात आली असावी असा एक अंदाज आहे. याखेरीज मतदानाची शाई निदान आठवडाभर तरी बोटावर राहते. ती निघत कशी नाही या कुतूहलापोटी पण लोकांनी सर्च केल्याचं आपण समजू शकतो. यात आघाडीवर आहेत ते दक्षिणेतील राज्य. याचं करण म्हणजे पहिल्या टप्प्यात आंध्र आणि तेलंगणा भागात मतदान झालं आहे.

मंडळी, हे आजचंच नाही बरं का. २०१६ साली पण मतदानाची शाई घालवण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गुगलकडे धाव घेतली होती. यावर्षीचं मतदान २३ मे २०१९ पर्यंत चालणार आहे. तो पर्यंत आणि त्यानंतरही काही दिवस हा सर्च ट्रेंडीग मध्ये राहिला तर नवल वाटायला नको !!

 

आणखी वाचा :

अच्छे दाग वाली ही शाई येते तरी कूठून : या घेऊया शाईचा मागोवा

सबस्क्राईब करा

* indicates required