९ कोटी लोकांची आधार कार्डांची माहिती लीक झालीय?? जाणून घ्या नक्की काय घडलंय!!

मंडळी, नुकतंच एक नवीन ‘डाटा लिक’ प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात कोणी मुद्दाम डाटा लिक केलेला नाही किंवा डाटा चोरीही केलेला नाही. यावेळी एका गंभीर चुकीने लाखो लोकांचा डाटा चोरीला गेला आहे. इंडेन या घरगुती गॅस सिलिंडर कंपनीने हा डाटा लिक केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. चला तर या याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

 

हा डाटा लिक कसा झाला ते पाहूया.

स्रोत

इंडेन वेबसाईटच्या ‘विक्रेता आणि वितरक’ (dealers and distributors) पोर्टलवर पासवर्ड आणि लॉगइन आयडी शिवाय प्रवेश मिळत नाही, पण गुगलवर याच पोर्टलच्या एका लिंकवरून कोणत्याही पासवर्ड आणि लॉगइन आयडी शिवाय कोणीही वेबसाईट मध्ये सहज प्रवेश करू शकतो. या लिंकमुळे लाखो ग्राहकांचे आधारकार्ड आणि पत्त्यांची माहिती कोणालाही आयती मिळते.

 

हे प्रकरण कोणी उघडकीस आणलं ?

स्रोत

फ्रेंच सायबर सिक्युरिटी संशोधक एलियट अॅल्डरसन यांनी हा खुलासा केला आहे. एलियट अॅल्डरसन यांना एका ट्विटर युझरने याची माहिती दिली होती. या युझरचं नाव त्यांनी गुप्त ठेवलं आहे.

याबद्दल माहिती मिळताच एलियट अॅल्डरसन यांनी एक चाचणी केली. या चाचणीत त्यांना ११,००० विक्रेत्यांची माहिती सहज मिळाली. याखेरीज तब्बल ५८ लाख ग्राहकांची माहिती अगदी हाता तोंडाशी आली होती. ही माहिती मिळण्यापूर्वीच इंडेनने ती लिंक ब्लॉक केली.

स्रोत

मंडळी ऑथेंटिकेशनच्या गंभीर चुकीमुळे डाटा लिकचा हा प्रकार घडला आहे. इंडेनच्या विकिपीडिया पेजवर दिलेल्या माहितीनुसार इंडेनकडे तब्बल ९ कोटी ग्राहक आहेत. याचा अर्थ तब्बल ९ कोटी लोकांच्या आधारकार्डची माहिती लिक झाली आहे असा याचा अर्थ होती का ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

(सर्व माहिती स्रोत - TechCrunch)

 

सबस्क्राईब करा

* indicates required