या फोटोने सोशल मिडिया का चक्रावलाय ? पाहा बरं या फोटोत असं काय आहे ते !!

मंडळी आज आम्ही तुमच्या मेंदूला चालना देणारी गोष्ट घेऊन आलो आहोत. ही गोष्ट मेंदूला गोंधळात पाडणारी आहे. जे दिसतं तसं नसतं म्हणतात ना त्याचं हे एक उदाहरण म्हणता येईल. आता खालील फोटो बघा.

स्रोत

या फोटोत काय वेगळं आहे ? वरवर तरी एक जोडपं एकमेकांच्या मिठीत दिसत आहे. यापलीकडे यात वेगळं काही दिसलं का ? दिसलं असेल तर तुम्ही हुशार आहात राव !! पण दिसलं नसेल तर आम्हीच सांगतो !!

या जोडप्याच्या पायांकडे बघा. काय दिसलं ? कोणते पाय कोणाचे आहेत ? मुलाचा रंग सावळा आहे पण त्याचे पाय पांढरे दिसतायत. मुलगी गोरी-चिट्टी आहे पण तिचे पाय काळे दिसतायत. हे नेमकं आहे तरी काय ? हेच तर आहे चॅलेंज भाऊ. थोडं डोकं खाजवा की !!

स्रोत

उत्तर मिळालं ? उत्तर मिळालं नसेल तर पुढे वाचा.

.

.

.

.

.

त्याचं कसं आहे ना राव, या मुलाने की नई काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत. फोटोच्या डाव्या बाजूला पाहा. मुलीच्या कपड्यातील काळा रंग आणि मुलाच्या कपड्यातील काळा रंग एकमेकात एवढे एकरूप झाले आहेत की दोघांच्या कपड्यातील वेगळेपण सहसा दिसून येत नाही. त्यामुळे कोणते पाय कोणाचे यात गफलत होते. त्यात भरीस भर म्हणजे हा फोटो ज्या पद्धतीने काढला गेला आहे त्यामुळे एक प्रकरचा भ्रम तयार होतो.

 

तर मंडळी, आहे की नाही डोक्याला शॉट ??

सबस्क्राईब करा

* indicates required