आता लोक लग्नही तिकीट लावून करणार ! पाहा बरं काय आहे ही भन्नाट आयडिया !!

भारतात लग्न म्हणजे दोन चार लोकांचं एकत्र येणं नसतं राव. लग्न म्हणजे सोहळा असतो. अनेक नातेवाईक, ओळखीतले, मित्रपरिवार एकत्र येतात. भारतात लग्न म्हणजे एक प्रकारे एकत्र येण्याचा बहाणा असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतातली लग्न हा पाश्चिमात्य जगासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. याच कुतूहलाचा उपयोग करून एका कंपनीने एक नवीन आयडिया शोधून काढली आहे राव. या कंपनीचं नाव आहे Join My Wedding.

स्रोत

भारतीय संस्कृतीची ओळख करून घ्यायची असेल लग्न हा सगळ्यात चांगला ऑप्शन ठरू शकतो. Join My Wedding मुळे भारतीय संस्कृतीत रस असलेल्या किंवा ‘भारतातली लग्न असतात तरी कशी ?’ याचं कुतूहल असलेल्या परदेशी पर्यटकांना भारतीय लग्नात सामील होता येतं. यासाठी वधूवर चक्क आपल्या लग्नाचे ‘तिकीट’ परदेशी नागरिकांना विकू शकतात. आहे की नाही भन्नाट आयडिया ?

स्रोत

Join My Wedding वर वधूवरांना रजिस्टर करता येतं आणि ज्या परदेशी पर्यटकांना लग्नाला उपस्थित राहायचं आहे ते रजिस्टर केलेल्या लग्न सोहळ्यातून एकाची निवड करू शकतात.

Join My Wedding च्या साईटवर दिलेल्या माहितीनुसार सामील झालेल्या प्रत्येक परदेशी पाहुण्याला भारतीय संस्कृतीशी जवळीक साधता येते. भारतीय पद्धतीचे कपडे, लग्नात होणारा गाण्याचा कार्यक्रम, लग्नविधी इत्यादी अनुभव जवळून घेता येतात.

स्रोत

तिकीटाच्या पैश्याचं म्हणाल तर ज्या मुलामुलींनी रजिस्टर केलं आहे त्यांना तिकिटाच्या पैश्याचा मोठा हिस्सा दिला जातो आणि उरलेला भाग हा कंपनी ठेवून घेते.

मंडळी, आजवर Join My Wedding मुळे अनेक परदेशी नागरिकांना भारतीय लग्न अनुभवता आला आहे. पर्यटकांसाठी आणि वधुवरांसाठी हा अनुभव अविस्मर्णीय होता.

सबस्क्राईब करा

* indicates required