लहानग्यांच्या बिछान्यात बिबट्या शिरला आणि......वाचा पुढे काय झाले !!

मंडळी, बिबट्या किंवा वाघ समोर दिसला तर काय कराल ? बियर ग्रील्स भाऊंनी यावर सोप्पा उपाय सुद्धा सांगितला होता. पण उपाय कितीही साधा सोप्पा असला तरी वाघ-बिबट्या समोर आला की आपली नक्कीच भंबेरी उडेल. सगळे देव आठवतील राव. असे अत्यंत खतरनाक प्राणी म्हणजे मृत्यूच. पण या मृत्युच्या दाढेतूनही लोक सुखरूप वाचतात. हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नसतम. असाच काहीसा प्रकार इगतपुरी मध्ये घडला आहे. एक बिबट्या चक्क मुलांच्या बिछान्यात शिरला पण मुलांना एक ओरखडाही आलेला नाही....

चला जाणून घेऊया नक्की काय घडलं तिथे....

स्रोत

इगतपुरीच्या धामनगावात मनीषा बर्डे यांच्या झोपडीत बिबट्याचा ३ महिन्यांचा बछडा शिरला होता. हा बछडा थंडीने गारठला होता. तो पहाटे ४ वाजता कोणाचाही नकळत घरात शिरला. घरात शिरताच त्याने मुलांच्या बिछान्यात प्रवेश केला. बिछान्यावर मच्छरदाणी पांघरून २ मुलांना झोपवण्यात आलं होतं. आश्चर्य म्हणजे बिबट्याच्या पिल्लाने मुलांना कोणतीही इजा पोहोचवली नाही तर तिथे चक्क दीड तास झोप काढली. मंडळी, पिल्लू ३ महिन्यांचं असलं तरी त्याच्याकडून मुलांना धोका होताच पण सुदैवाने तसं काही घडलं नाही.

मनीषा बर्डे यांनी मुलांच्या बिछान्यात बिबट्याला बघितल्यानंतर लगेचच वनविभागाकडे धाव घेतली. वनविभागाच्या टीमने मिळून या बिबट्याला ताब्यात घेतलं. या बिबट्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राव, व्हिडीओ बघून समजतं – ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती...’

मंडळी, जंगली भागाच्या जवळपास राहणाऱ्या वस्त्यांमध्ये बिबट्या वारंवार शिरत असतो. मुंबईतली आरे कॉलनी यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे वारंवार अशा घटना घडत असतात. गेल्याच वर्षी एका आईने आपला जीव धोक्यात घालून बिबट्याच्या तावडीतून बाळाला सोडवलं होतं. याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी आमचा खालील लेख वाचायला विसरू नका.

आई तारी त्याला कोण मारी...जीव धोक्यात घालून आईने वाचवला चिमुरड्याचा जीव !!

सबस्क्राईब करा

* indicates required