व्हिडीओ ऑफ दि डे : हेल्मेट न घातलेल्या पोलिसांची गाडी अडवावी का? अडवल्यावर काय होतं बघून घ्या राव!

राव हेल्मेट सक्तीवरून सध्या राडा सुरु आहे. नाही, आम्ही पुणेकरांबद्दल बोलत नाही आहोत. आम्ही आज मुंबईचा एक किस्सा सांगणार आहोत. मुंबईच्या तरुणांनी हेल्मेट न घातलेल्या पोलिसाची गाडी अडवली आणि पुढे.....पुढे काय झालं ते तुम्हीच बघा. या घटनेत कोणाची बाजू बरोबर आहे किंवा कोण चुकीचं आहे हे ठरवण्याची जबाबदारी आम्ही तुम्हा वाचकांवर सोडत आहोत.

मंडळी, व्हिडीओ मध्ये सगळी घटना तुमच्या समोरच आहे. कॉन्स्टेबलची चावी ताब्यात घेणारा तरुण आहे पवन सायदनी. त्याला साथ देणारे त्याचे आणखी २ मित्र तिथे उपस्थित आहेत. हा व्हिडीओही त्यांनीच काढला आहे.

हेल्मेट सक्तीचा कायदा पोलिसांना पण लागू होतो या कारणावरून हा सगळा राडा झाला. पवन कडून दंड वसूल करण्यात आला होता हाही राग त्याच्या बोलण्यातून दिसतोय. गाडी अडवल्यानंतर त्याने चावी ताब्यात घेतली आणि हेल्मेट मिळे पर्यंत त्याने ती परत दिली नाही. तिथे उपस्थित एका व्यक्तीने प्रसंग बघून कॉन्स्टेबल साहेबांना हेल्मेट आणून दिला तेव्हा कुठे हे प्रकरण मिटलं.

स्रोत

ही गोष्ट वाटते तेवढी सोप्पी नाही. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तपासणीत असं समजलं की तिघेही त्यावेळी नशेत होते. दोघांवर कलम ३५३ आणि ३४१ नुसार गुन्हेगारी पद्धतीने सार्वजनिक कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून रोखण्याचा आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडळी, तिघांनाही शिक्षा झाली म्हणजे कॉन्स्टेबल साहेब सुटलेले नाहीत बरं का. कॉन्स्टेबल पंढरीनाथ रामू यांच्याकडून हेल्मेट न घातल्याबद्दल ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय.

या सर्व घटनेत पंढरीनाथ रामू हे निमुटपणे आपली चूक मान्य करून उभे होते. त्यांनी पवन किंवा त्याच्या मित्रांना उलट प्रश्न केला नाही. पण पवन आणि त्याच्या मित्रांचा हेल्मेटचा मुद्दाही रास्त आहे.

तर आता तुम्हीच या घटनेबद्दल आपलं मत द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required