बायकोचा मार खाण्यात भारतीय तिसऱ्या नंबरवर.. पण भारतात कुठल्या राज्यात याचे बळी सर्वाधिक आहेत ?

“बायकोकडून मार खाण्यातही भारतीय सबसे आगे!” हा आम्हा लेख आठवतोय का ? पत्नीच्या हातून बेदम मार खाणाऱ्या पुरुषांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे याबद्दल आम्ही माहिती दिली होती. आता याच माहितीला दुजोरा देणारी गोष्ट घडली आहे. त्याचं काय आहे ना, मध्यप्रदेश पोलिसांनी एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार पत्नीकडून पतीला होणाऱ्या मारहाणीच्या संख्येत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  

राव, समस्त पतिराजांना चिंतेत टाकणारा हा अहवाल आहे हे काही वेगळं सांगायला नको. मध्यप्रदेश पोलिसांनी पती कडून हिंसेची तक्रारीचं प्रमाण जाणून घेण्यासाठी ‘पतीला पत्नीकडून होणारी मारहाण’ (wives beating husbands’) ही नवी श्रेणी तयार केली आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार मध्यप्रदेश मध्ये ४ महिन्यात तब्बल ८०२ पुरुष घरगुती हिंसेला बळी पडले आहेत.

स्रोत

“डायल १००” या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीतून हा आकडा मिळाला आहे. या ८०२ पैकी सर्वात जास्त तक्रारी इंदौर मधून (७२) आल्या आहेत. त्यानंतरचा नंबर लागतो भोपाळचा (५२). राव, स्त्रियांमध्ये शिक्षण, हक्कांची जाणीव आणि स्त्री पुरुष समानता याबद्दल जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या कोणत्याही दबावाच्या किंवा हिंसेच्या विरुद्ध उभ्या राहत आहेत हेच यातून सिद्ध होते.

मंडळी, पतिराजांच्या मारहाणीच्या तक्रारी वाढलेल्या असल्या तरी पत्नीवर होणारी हिंसा थांबलेली नाही. मध्यप्रदेश मध्ये हा आकडा तब्बल २२,००० आहे.  यापैकी सर्वात पुढे खुद्द इंदौर शहर आहे.

राव, मध्यप्रदेश हे एक उदाहरण झालं. यात महाराष्ट्र सुद्धा पाठी नाही. शेवटी एवढंच सांगतो पत्नीला खुश ठेवा नाही तर या लोकांमध्ये तुमचापण समावेश होईल. आणि समावेश झालाच तर आमचा हा लेख वाचा....”बायकोचा छळ सोसणार्‍या त्रस्त नवरोबांनो... तुमच्यासाठीच आहे हा आगळावेगळा आश्रम !!”

बघा राव, नाय तर म्हणाल सांगितलं नाही....

सबस्क्राईब करा

* indicates required