स्विगीने चेन्नईच्या ग्राहकासाठी पाठवली थेट राजस्थानातून डिलिव्हरी!! नक्की काय भानगड झाली?

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयमुळे काही महिन्यापूर्वी मोठा वाद झाला होता. हे लक्षात घेऊन स्विग्गी, फॅसोस, फूड पांडा या सारख्या बाकीच्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसनी आपल्या ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देऊ केली आहे. स्विग्गीने मात्र हे भलतंच मनावर घेतला आहे.

अहो नुकताच घडलेला किस्सा बघा ना. चेन्नईच्या एका व्यक्तीसाठी स्विग्गीने थेट राजस्थानातून जेवण पाठवलं आहे. ही ऑर्डर केवळ १३८ रुपयांची होती.

का आहे हा किस्सा ? 

त्याचं काय झालं, चेन्नईच्या एका व्यक्तीने स्विग्गीवरून केवळ १३८ रुपयांचं जेवण मागवलं होतं. यासाठी त्याने हॉटेलही जवळचच निवडलं होतं. स्विग्गीने मात्र हे अन्न थेट राजस्थानच्या हॉटेल मधून त्याच्या पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. म्हणजे बघा चेन्नईच्या एका ग्राहकासाठी स्विग्गीने चक्क राजस्थानवरून अन्न पाठवलं. वेडसरपणा वाटतो नाही का ? यावर स्विग्गीने काय उत्तर दिलंय ते पाहा.

स्विग्गीने म्हटलंय की ‘आम्ही आमच्या ग्राहकांसाठी चंद्रावरही जाऊ’....

गंमत सोडा राव. असं कधी असतंय का. असं जर झालं तर उद्याच्या जेवणासाठी आदल्या दिवशीच जेवणाची ऑर्डर द्यावी लागेल. स्विग्गीने स्वतःचा विनोद बाजूला ठेवून याकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे. खरं तर हा स्विग्गीच्या सिस्टम मधला एरर होता. हे लक्षात घेऊन स्विग्गीने तसं कबूलही केलंय. कदाचित आता पर्यंत त्या व्यक्तीला आपलं जेवण मिळालं असावं, अशी आपण आशा करू.

तर मंडळी, तुम्ही कधी ऑनलाईन जेवण मागवलं आहे का ? तुमच्याकडे असे अतरंगी किस्से असतील तर आमच्याशी नक्की शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required