computer

या गावात केली जाते सापाची शेती....कमाईचा आकडा बघून चक्कर येईल भाऊ !!

सहसा आपण सापांच्या नादी लागत नाही राव. पण चीन मधल्या एका गावात चक्क सापांची शेती केली जाते. चला आज या गावात एक चक्कर मारून येऊया आणि जाणून घेऊया की इतक्या सापांचं ते नक्की करतात तरी काय...

चीनच्या ‘झेजियांग’ प्रांतात ‘जिसिकियाओ’ नावाचं एक गाव आहे. या गावाला स्थानिक भाषेत सापांचं गाव म्हटलं जातं. या गावात माणसांपेक्षा सापांची संख्या जास्त आहे. गावाची लोकसंख्या १००० आहे आणि सापांची १०० शेतं या गावात आहेत. आज गावातील १७० कुटुंबांचं पोट सापावर चालतं राव.

सापाचं उत्पादन का केलं जातं ?

तुम्हाला तर माहित असेलच चीनमध्ये अनेक विचित्र गोष्टी खाल्ल्या जातात. त्यातलाच साप एक प्राणी आहे. साप चीनमध्ये चवीने खाल्ला जातो. हजारो वर्षांपासून चीनी लोक सापाला अत्यंत औषधी मानतात.  त्यामुळेच सापापासून तयार होणारी वाईन चीनमध्ये प्रसिद्ध आहे. याशिवाय सापाच्या १ ग्राम विषासाठी चिनी लोक ३० ते ५० हजार रुपये मोजतात.

स्रोत

आजच्या आधुनिक युगातही सापापासून तयार होणाऱ्या औषधांची मागणी कमी झालेली नाही. चीनमध्ये  सापाच्या मूत्राशय, यकृत आणि त्वचेपासूनपासून औषधं तयार करणाऱ्या  अनेक फार्मा कंपन्या आहेत. या औषधांमध्ये सुदृढ शरीरासाठी लागणाऱ्या सप्लिमेंट्सचाही समावेश असतो. जपान, अमेरिका, युरोप आणि साऊथ कोरिया या भागातून या औषधांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

सापांच्या विक्रीतून कमाई किती होते ?

राव, कमाईचं विचारलं तर तुम्हाला धक्का बसेल. या गावातून दरवर्षी ३० लाख साप विकले जातात. या विक्रीतून वर्षाकाठी तब्बल १२ मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे जवळजवळ ८४ कोटी रुपयांची कमाई होते. आता समजलं हे लोक एवढी खतरनाक शेती का करतात ते ?

सापांना पाळण्यात धोका तर असेल ना ?

मंडळी, सापापासून जेवढी कमाई होते तेवढाच धोका सुद्धा पत्करावा लागतो. साप चावणे हा प्रकार या गावासाठी नवीन नाही. नाग, अजगर आणि विषारी घोणस यासारखे अत्यंत खतरनाक साप इथे पाळले जातात.  साप चावल्यानंतर बचावासाठी इथले शेतकरी विषबाधेवरचं औषध आणि इंजेक्शन घेतात. काहीवेळा मृत्यूसुद्धा ओढवतो.

मंडळी, हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोच आहे. कितीही मोठा धोका असला तरी नफा तेवढाच मोठा आहे. या गावातल्याच एका शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर, ‘इतरांकडे नोकरी करण्यापेक्षा मी घरी राहून सापाची शेती करेन, कारण इथे पैसा जास्त आहे’....

 

आणखी वाचा :

पाहा व्हिडिओ: असंख्य सापांच्या विळख्यातून कशी सुटली ही समुद्री पाल

बाबो !! मुंबईच्या लोकल मध्ये शिरला अनोळखी पाहुणा....व्हिडीओ पाहून घ्या राव !!

तिची त्वचा सापासारखी बदलते : वाचा जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या शालिनीची कहाणी...

फक्त पावसाळ्यात दर्शन देणारे ११ भारतीय प्राणी !!

सबस्क्राईब करा

* indicates required