४० वर्षांपूर्वी हरवलेला माणूस व्हायरल व्हिडीओ मध्ये सापडला...वाचा नक्की काय घडलंय ते !!

मंडळी, रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसापुरती त्यांची चर्चा होते आणि त्यानंतर नवीन व्हिडीओ व्हायरल झालेला असतो. पण आज ज्या व्हायरल व्हिडीओ बद्दल आपण वाचणार आहोत त्या व्हिडीओने एक मोठं काम केलं आहे. या एका व्हिडीओमुळे तब्बल ४० वर्षांपूर्वी हरवलेला माणूस घरी परतणार आहे.

झालं असं की, एका फोटोग्राफरने मुंबई मध्ये एका वृद्ध माणसाला गाताना पाहिलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड केला. हा व्हिडीओ मुंबई मधला आहे. व्हिडीओ मध्ये दिसणारा माणूस आहे खोमदाराम गंभीर सिंग. तो ४० वर्षापूर्वी इम्फाळमधून  बेपत्ता झाला होता. घरच्यांनी सांगितल्या प्रमाणे तो काहीही न सांगता घरून निघून गेला होता. त्यानंतर त्याला शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले पण तो सापडला नाही. अशीच ४० वर्ष गेली.

स्रोत

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ खोमदारामच्या पुतण्याने पहिला आणि त्या वृद्ध माणसाला त्याने ओळखलं. पण खोमदारामच्या घरच्यांकडे पैसे नसल्याने खोमदारामला घरी आणण्यात अडचण येत होती. त्यांची अडचण ओळखून अरुणाचल प्रदेशच्या एका प्रोफेसरने ही बातमी मुंबई पोलिसांना कळवली आणि त्यांच्याकडे खोमदारामला घरी पाठवण्याची विनंती केली.

शेवटी मुंबई पोलिसांच्या मदतीने खोमदाराम गंभीर सिंग तब्बल ४० वर्षांनंतर आपल्या घरी परतणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required