स्ट्रॉबेरीत सुया टोचणाऱ्याला शोध आणि १ लाख डॉलर मिळवा....काय आहे ही अतरंगी ऑफर ?

मंडळी, तुम्हाला आठवत असेल आपल्याकडे काही वर्षांपूर्वी सिनेमागृहातल्या सीटखाली रोगाची सुई असल्याची अफवा पसरली होती. या अफवेने फेसबुक आणि आतातापर्यंत व्हॉटसअॅपसुद्धा ओसंडून वाहत होतं. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियात घडलाय. भारतात तरी ही अफवाच होती, पण ऑस्ट्रेलियात मात्र हे खरं ठरलंय.

आधी समजून घेऊया हे प्रकरण आहे तरी काय...

सध्या ऑस्ट्रेलियात स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरु आहे. या हंगामात कोणीतरी चक्क स्ट्रॉबेरीमध्ये सुया टोचल्या आहेत. ऑस्ट्रेलियातल्या सहा राज्यांमध्ये असे बॉक्सेस आढळून आले आहेत. एकजण जखमीसुद्धा झालाय. मग काय, खळबळ माजली ना राव. ऑस्ट्रेलियातल्या प्रसिद्ध व्यापाऱ्यांनी आपापल्या स्ट्रॉबेरीज परत मागवल्या आहेत. जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नाही तो पर्यंत ऑस्ट्रेलियावासी स्ट्रॉबेरीजना मुकणार आहेत.

स्रोत

ऑस्ट्रेलियन सरकारने तर जाहीर केलंय, जो कोणी या मागच्या सूत्रधाराची माहिती देईल त्याला सरकारतर्फे तब्बल १ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स मिळतील.

राव, हे काय कमी होतं की काय म्हणून आता सुया टोचलेल्या केळीसुद्धा आढळल्या आहेत. याचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेवर झालाय. न्युझीलंड मधून ऑस्ट्रेलियन स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते पण या घटनेमुळं तूर्तास निर्यात थांबवण्यात आली आहे.

राव, कोण म्हणतं अशा घटना फक्त भारतातच घडतात??

सबस्क्राईब करा

* indicates required