बापरे, ठाण्यात रिक्षावाले लोकांना नाही म्हणणार नाहीत ? का, ते जाणून घ्या..

मुली जेवढं मुलांना नाही म्हणत नाहीत त्यापेक्षा जास्त नाही तर रिक्षावाले म्हणतात राव,. अमुक ठिकाणी जाणार का ? नाही !!...तमुक ठिकाणी जाणार का ? नाही !!....राव, हे नाही नाही ऐकून उन्हात आणखी डोकं तापतं. म्हणूनच ठाण्यात एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचं नाव आहे ‘हो रिक्षा’.

या उपक्रमामध्ये रिक्षाचालक ग्राहकांना नाही म्हणू शकणार नाही. ठिकाण कोणतंही असो रिक्षाचालकांना प्रत्येक भाड्यासाठी ‘हो’ म्हणावं लागणार आहे. राव, याचा रिक्षाचालकांना काय फायदा होईल ? तर, उपक्रमात सामील झालेल्या चालकांपैकी ५ जणांना बक्षीस म्हणून रोज १५० रुपयाचं किराणा खरेदीचे व्हाउचर्स देण्यात येतील. म्हणजे ग्राहक आणि चालक दोघांचा फायदा राव.

स्रोत

या रिक्षा ओळखता याव्यात म्हणून रिक्षांवर ‘हो रिक्षा’ असा स्टीकर लावण्यात येणार आहे. असा प्रयोग पहिल्यांदाच होताना दिसेल राव. रिक्षावाल्यांच्या नकार घंटेला ऐकून कंटाळलेले ठाणेकर आता सुटकेचा निश्वास सोडणार आहेत.

दैनिक ठाणे वैभव, ठाणे वाहतूक पोलीस, आरटीओ आणि अपना बाझार  यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम १ जून रोजी सुरु होईल. मंडळी आश्चर्य म्हणजे ‘हो’ रीक्षामुळे ग्राहकांबरोबर चालक सुद्धा खुश आहेत.

 

आणखी वाचा :

एका जबरा फ्यानला मिळाले ७५ हजाराचे तिकीट फुकट !!

सबस्क्राईब करा

* indicates required