ट्रोलिंग करणाऱ्यांच्या विरोधात इंग्लंडच्या राजघराण्याने काढलाय जाहीरनामा...काय आहेत याची कलमं??

कोणत्याही राजकीय पक्षाबाबत किंवा एखाद्या नेत्याबाबत अपशब्द काढले की आपल्याकडचे खंदे कार्यकर्ते त्या माणसाच्या घरी जाऊन राडा घालतात. तुम्हाला वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही, या गोष्टी नेहमीच घडत असतात.

तर, इंग्लंडच्या शाही घराण्याला सध्या अशाच ट्रोलिंगचा आणि अपशब्दांचा त्रास होत आहे. आता त्यांच्याकडे आपल्या इकडच्यासारखे कार्यकर्ते नाहीत म्हणून त्यांनी एक शाही फर्मान काढून काही मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. या तत्वांच उल्लंघन करणाऱ्याची कमेंट काढून टाकण्यात येईल, त्याला ब्लॉक करण्यात येईल आणि वेळ आली तर पोलिसात तक्रारही करण्यात येऊ शकते.

काय आहे हे प्रकरण ? चला जाणून घेऊ या !!

स्रोत

सध्या ब्रिटीश शाही परिवारातील मेगन मार्कल आणि केट मिडलटन यांना सोशल मिडीयावर ट्रोल केलं जातंय आणि त्यांच्यावर घाणेरडी शेरेबाजी होत आहे. या ट्रोलिंगचं स्वरूप हे वंशद्वेषी आणि लिंगभेद दाखवणारं आहे. अशा स्वरूपाच्या ट्रोलिंगमुळे शाही परिवाराने मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करून आपल्या फॉलोअर्सकडून सौजन्य आणि आदराची मागणी केली आहे. या मार्गदर्शक तत्वांमध्ये नेमकं काय सांगितलंय ते पाहूया.

सोशल मिडीयावर असलेल्या शाही परिवारातील कोणाच्याही प्रोफाईलवर कोणतीही कमेंट अपमानजनक, अश्लील, धमकावणारी, कोणत्याही प्रकारे भेदभाव दाखवणारी, विषयाशी संबंधित नसलेली आणि जाहिरात दर्शवणारी नसावी.

स्रोत

शाही परिवाराने कमेंट्सना डिलीट करण्याचा, युझर्सना ब्लॉक करण्याचा आणि पोलीस रिपोर्ट करण्याचा आपला हक्क अबाधित असल्याचं सांगितलं आहे. खरं तर हे काम सोशल मिडिया साईट्सचं आहे पण या कामात या साईट्स फारच धीम्या असल्याचं दिसून आलंय.

मंडळी, आता समजा हेच आपल्याकडे घडलं असतं तर ? विचार करा काय राडा झाला असता !!

सबस्क्राईब करा

* indicates required