ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी नाही मंडळी...व्हिडीओ पाहून घ्या राव !!

मंडळी, आपल्याकडे दोन वर्षांपूर्वी मोठा दुष्काळ पडला होता. असाच काहीसा दुष्काळ यावर्षी ऑस्ट्रेलियात पडला आहे. हा दुष्काळ किती भयानक आहे याचं वास्तव दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

या व्हिडीओ मध्ये गुरांचा घोळका पाणी पिण्यासाठी जमा झालेला दिसतोय. पाण्याच्या कमतरतेमुळे गुरांसाठी टँकरने पाणी पोहोचवलं जातंय. या व्हिडीओ मागची गोष्ट ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा उभा राहील राव.

व्हिडीओत दिसणारी गाई गुरे ऑस्ट्रेलियाच्या ‘न्यू साउथ वेल्स’ भागात राहणाऱ्या ‘अँबर ली’ यांची आहेत. त्यांनीच या दृश्याला आपल्या कॅमेऱ्याने टिपलंय. त्यांनी सांगितल्या प्रमाणे न्यू साउथ वेल्स भागात पाण्याचे साठे अत्यंत कमी आहेत. नदी किंवा कुंडातलं पाणी जनावरांना दिलं जातं. पण तेही पुरेसं नाही. अँबर ली यांच्या १३०० गुरांना रोज तब्बल १,००,००० लिटर पाणी लागतं. हे पाणी मिळवण्यासाठी त्यांना रोज ५० ते ८० किलोमीटर टँकरने प्रवास करावा लागतो.

मंडळी, अशी वेळ पुन्हा आपल्यावर येऊ नये....

सबस्क्राईब करा

* indicates required