computer

'फूड चेन' : पिझ्झा हट आणि झोपडीचा काय संबंध आहे ? वाचा पिझ्झा हटच्या जन्माची गोष्ट !!

फूड चेनच्या पहिल्या भागात आपण डॉमिनोज पिझ्झाच्या जन्माची गोष्ट वाचली होती. आज दुसऱ्या भागात वाचूया 'पिझ्झा हट'.

कनसास या अमेरिकेतील शहरात राहणाऱ्या दोन भावांनी मिळून पिझ्झा हटची स्थापना 1958 मध्ये केली. डॅन कारनी आणि फ्रॅंक कारनी नावाचे हे दोन भाऊ. कॉलेज मध्ये शिकत असताना काही कमाई पण व्हावी या उद्देशाने यांनी आईकडून सहाशे डॉलर उसने घेतले आणि एका झोपडीसारख्या जागेत पिझ्झा रेस्टॉरंट सुरू केले. नाव नोंदवताना त्यांना नऊच अक्षरे वापरण्याची परवानगी मिळाली म्हणून त्यांनी स्वतःच्या दुकानाचे नाव पिझ्झा हट असे ठेवले.

(कारनी बंधू)

आपल्या दुकानाच्या स्थापने दिवशी जाहिरात म्हणून त्यांनी पिझ्झा लोकांना फुकट वाटला. लोकांना त्याची चव फारच आवडली आणि नंतर कारनी भावांनी मागे वळून पाहिलेच नाही. आपला पिझ्झा इतर ठिकाणी सुद्धा उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी चेन सुरुवात करण्याचे ठरवले. 1972 पर्यंत पिझ्झा हट स्टोअर्स अमेरिकेभर पसरले होते. ही लोकप्रियता बघून ‘पेप्सीको’ कंपनीने पिझ्झा हट कंपनी विकत घेतली आणि या चेनचा विस्तार जगभरात केला. आज पिझ्झा हटच्या ‘स्टफड क्रस्ट’ या स्पेशल पिझ्झाचे लोक दिवाने झाले आहेत. 

डॉमिनोज जरी चीन मध्ये यशस्वी ठरली नसली तरी पिझ्झा हटने मात्र तिथे चांगले बस्तान बसवले आहे. भारतात मात्र आपल्या प्रतिस्पर्धी डॉमिनोज पेक्षा ही कंपनी बरीच पिछाडीवर आहे.

 

लेखक : अनुप कुलकर्णी

 

 

आणखी वाचा :

'फूड चेन' : आजच्या पहिल्या लेखात वाचा 'डॉमिनोज पिझ्झा'च्या जन्माची गोष्ट !!!

सबस्क्राईब करा

* indicates required