प्रिन्स भाऊ हॅरी आणि मेगन वहिनी का करणार आहेत ६३ कोटींचा आहेर परत ?? 

राव, लग्नातला आहेर आपण परत करतो का? साधं लग्नात आलेलं ताट सुद्धा आपण परत करत नाय. पण नुकतंच लग्न झालेले आपले प्रिन्स भाऊ हॅरी  आणि वहिनी मेगन मार्कल यांनी त्यांना मिळालेला ६३ कोटी रुपयाचं आहेर परत करण्याचा डिसिजन घेतलाय.
त्याचं काय आहे ना भाऊ, दोघांनी लग्न पत्रिकेत ठळक अक्षरात म्हटलेलं ‘कृपया आहेर आणू नये.. आपली उपस्थिती हाच आहेर!!’ पण पब्लिक काय ऐकणार आहे का? त्यांनी दिले पाठवून प्रेझेंट्स!! आता हे दोघं नवरा बायको ठरले शाही घराण्यातले. शाही घराणं म्हणजे त्यांचे लय कडक नियम असत्यात. ‘नाही म्हणजे नाही’!!


राव आधी शाही कुटुंबाचे नियम वाचून घ्या मग पुढचं सांगतो :
नियम १.
नियमांनुसार गिफ्ट स्वीकारताना रॉयल सदस्याची परवानगी घेणं बंधनकारक आहे.
नियम २.
शाही सदस्यांना फक्त दीडशे पाऊण्ड (१३ हजार ४९३ रुपये) पेक्षा कमी किमतीच्या वस्तू स्वीकारण्याची परवानगी आहे.

राव, लग्न म्हटल्यावर आहेर येणार हे ओळखून आपल्या दादा वाहिनीने एक आयडिया काढली होती. आहेर देण्याऐवजी त्यांनी निवडलेल्या ७ चॅरिटी ट्रस्ट्सला दान देण्याबद्दल त्यांनी लोकांना आवाहन केलं होतं. (यात आपल्या मुंबईच्या ‘'मैना महिला फाऊण्डेशन'चाही समावेश आहे.)
तर, या ७ संस्थांना दान देऊन आहेर पोचला म्हणून समजा असं दादा वहिनींनी ठरवलं होतं.  पण लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. मग आता काय शाही नियम तो नियम असतो ना राव. या सर्व गिफ्ट आता परत करण्यात येणार आहेत. 


या गिफ्टची किंमत ७ मिलियन पाऊंड म्हणजे ६२ कोटी ९७ लाख ५२ हजार १९० रुपये एवढी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required