अबब इंग्लंडची राणी थेट मोहम्मद पैगंबरांची वंशज आहे ?

मंडळी, इतिहास जेवढा उकरून बघू तेवढी नवीन माहिती समोर येते. आता हेच बघा ना, इंग्लंडची राणी ही चक्क मोहम्मद पैगंबरांची वंशज आहे असा दावा केला जातोय. हा दावा केलाय मोरोक्कोच्या ‘अल-उस्बुए’ या वर्तमानपत्राने. राणी एलिझाबेथच्या ४३ पिढ्यांचा अभ्यास करून हा अनुमान लावण्यात आला आहे.

पण मंडळी, इंग्लंडची राणी थेट अरबस्तानातील पैगंबरांची वंशज कशी ? चला थोडा मागोवा घेऊ....

वर्तमानपत्रात सांगितल्याप्रमाणे सध्याची इंग्लंडची राणी ‘एलिझाबेथ २’ ही थेट स्पेनचा राजा अबु-अल-कासिम मोहम्मद बिन-अब्बाद याच्याशी नातं सांगणारी आहे. या राजाची नाळ जाऊन पोहोचते थेट मोहम्मद पैगंबरांपर्यंत. या राजाला एक जायदा नावाची मुलगी होती. ११ व्या शतकात सेविले (आंदालुसिया) वर झालेल्या हल्ल्यानंतर जायदा स्पेनला पळाली.

मोहम्मद पैगंबर (स्रोत)

स्पेनला आल्यानंतर तिने आपलं नाव ‘इझाबेल’ बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पुढे तिने स्पेनच्या राजाशी लग्न केलं. या दोघांचा मुलगा सांचो. सांचो च्या वंशजांचा पुढे संबंध आला केम्ब्रिजच्या घराण्याशी. केम्ब्रिजचे राजे तिसरे अर्ल रिचर्ड हे सांचो चे वारस आणि त्याच बरोबर इंग्लंडच्या राजाचे नातू.

खरं तर ज्या जायदा पासून ही गोष्ट सुरु होते तिच्या बद्दल अनेक वाद आहेत. काही इतिहासकार असं म्हणतात की जायदाने एका खलिफाच्या घरात लग्न केलं होतं. त्यामुळे तिची नाळ पुढे स्पेन आणि इंग्लंड पर्यंत जाणं शक्य नाही.

एकंदरीत मोरोक्कोच्या वर्तमानपत्राला असं सांगायचं आहे की युरोपीय देशांमध्ये पैगंबरांच रक्त वाहत आहे.

 

आणखी वाचा :

इंग्लंडच्या राणीला चक्क 'या' कामासाठी लेखक हवाय...

असा आहे इंग्लंडच्या राणीच्या मृत्युनंतरचा प्लॅन : पाहा सिक्रेट कोड काय आहे...

का केला आजच्या दिवशी इंग्लंडने स्कॉटलंडच्या राणीचा शिरच्छेद ?

सबस्क्राईब करा

* indicates required