रेल्वेच्या व्हाट्सऍप हेल्पलाईनला केले या मेसेजेसनी बेजार!!

मंडळी व्हाट्सऍपशिवाय आपण  आता काय आयुष्य काढू शकत नाही. तुम्हीपण आमच्या सारखेच दिवसभर मोबाईलला चिकटून बसलेले असता का हो? तर मंडळी, वेगवेगळ्या सेवा व्हाट्सॲपवर येणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि बऱ्याच सेवा आता व्हाट्सॲपवर येत आहेत.

तर झालंय असं की, आपल्या सोयीसाठी रेल्वेनं अशीच एक हेल्पलाईन सुरू करायचं ठरवलं.  प्रवाशांना स्टेशनवरच्या आणि टॉयलेटमध्ये असलेल्या अस्वच्छतेची तक्रार करता यावी या उद्देशानं ही हेल्पलाईन सुरू करण्यात आलीय.  वेस्टर्न रेल्वेचा 9004499773 आणि सेंट्रल रेल्वे चा 9987645307 असे नंबरही जाहीर करण्यात आले आहेत. या नंबरवर आजवर फक्त 25 तक्रारी आल्या आहेत. 

पण,  गमतीचा भाग असा आहे की आपल्याला "आला मेसेज, केला फॉरवर्ड" या न्यायानं आपण रोज शेकडो मेसेजेस फॉरवर्ड करत असतोच, त्याचाच फटका या हेल्पलाईनला बसला आहे. त्यांना गुड मॉर्निंग, गुड ईव्हीनिंगचे मेसेजेस ढीगाने आलेच पण त्याला साथ दिलीये फ्रेंडशिपडे मेसेजेसने. या सगळ्यावर कहर म्हणजे त्यानां "हा मेसेज 15 लोकांना फॉरवर्ड करा तुम्हाला देव पावेल" छापाचे मेसेजेस पण आलेत!! आता घ्या. 

एकूणच काय, आपल्या मेसेजेस बल्क फॉरवर्ड करायच्या सवयीमुळं अशा काही महत्त्वाच्या सोयीसुद्धा काही दिवसांनी बंद पडतील आणि आपल्याला तक्रार करायला स्टेशन मास्तर ऑफिसात जावे लागेल.

सबस्क्राईब करा

* indicates required