इंजिनियर झाल्यावर त्याने वडिलांना त्यांच्याच रिक्षातून फिरवलं ?? बातमी किती खरी किती खोटी ?

मंडळी, सेहवागने काही दिवसापूर्वी एक फोटो अपलोड केला होता. या फोटो मध्ये हिसामुद्दिन खान नावाचा मुलगा इंजिनियर झाल्यानंतर आपल्या रिक्षाचालक वडिलांना त्यांच्याच रिक्षामधून फिरवताना दिसतोय. वडिलांच्या शेजारी त्याची आई सुद्धा दिसत आहे. या फोटोने हिसामुद्दिन खानवर कौतुकाचा वर्षाव झाला. फोटो रातोरात व्हायरल झाला. पण या सगळ्यामध्ये फोटो मागील सत्य कोणी तपासलं नाही. चला तर आज जाणून घेऊया या फोटो मागील ‘व्हायरल सत्य’.

मंडळी, फोटो मध्ये दिसत असलेल्या मुलाचं खरं नाव आहे ‘वली उल्ला’. त्याचे वडील रिक्षा चालक नसून शेतकरी आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे तो इंजिनियर झालेला नाही तर त्याने ढाका मधून Accountancy & Information Systems ची पदवी मिळवली आहे. पदवी मिळाल्यानंतर त्याने पदवीधरांचा सूट वडिलांना दिला तर टोपी आईला घातली.

आपल्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे हे जेव्हा वली उल्लाला समजलं तेव्हा त्याने फेसबुकवर स्वतःची खरी माहिती सांगितली. यानंतर मात्र वीरेंद्र सेहवागनेही आपली चूक झाल्याचं मान्य केलं.

मंडळी, व्हायरल फिरणाऱ्या पोस्टी न तपासता पुढे ढकलायच्या हे फक्त आपण सामान्य माणसंच करतो असं नाही बरं, वीरेंद्र सेहवाग सारखे बडे लोकही हेच करतात.

सबस्क्राईब करा

* indicates required