मिस्टर बिनच्या मृत्यूची बातमी आली तर लगेच डिलीट करा...कारण जाणून घ्या भाऊ !!

राव, ‘मिस्टर बिन’चा रोल करणारे ‘रॉन अॅट्कीन्सन’ यांचा मृत्यू झाल्याची बातमी तुम्हाला आली का ? बातमी सोबत एक लिंक किंवा व्हिडीओ आला असेल तर तो आताच्या आता डिलीट करा, कारण या लिंकवर जाताच तुमची माहिती लिक होऊ शकते भौ.

रॉन अॅट्कीन्सन यांचा मृत्यू हा काही नवीन नाही. त्यांचा फेक मर्डर अनेकदा करण्यात आलाय. पण यावेळी ही फक्त बातमी नव्हे तर काही सायबर गुन्हेगारांनी तुमची माहिती ढापण्यासाठी तयार केलेलं एक जाळं आहे.

फेक व्हिडीओ

मंडळी, जून २०१७ पासून या खोट्या बातम्या पसरत आहेत. ही बातमी देताना म्हटलं जातं की, एका कार अपघातात मिस्टर बिनचा रोल करणारे ‘रॉन अॅट्कीन्सन’ यांचा मृत्यू झाला. सोबत एक व्हिडीओ पाठवला जातो. या व्हिडीओवर जाताच आपण एका वेबसाईटला रिडायरेक्ट होतो. तिथे आपल्याला एक फोन नंबर दाखवला जातो. या नंबरवर फोन केल्यास तुम्हाला तुमचे कार्ड डीटेल्स मागितले जातात.

फेक आर्टिकल

जुनी बातमी (स्रोत)

व्हिडीओ बरोबरच एका फेक वेबसाईट वरील आर्टिकलचा वापर केला जातो. हा आर्टिकल ‘फॉक्स न्यूज’ नामक वेबसाईटवरून आलेला दाखवला जातो. या आर्टिकलवर क्लिक केल्यास ERROR पेज येतो. या पेजवर लिहिलेलं असतं ‘माहिती लॉक’ आहे. अनलॉक करण्यासाठी अमुक अमुक नंबरवर क्लिक करा. या क्रमांकावर फोन केल्यास तुमच्या बँकेशी निगडीत माहिती चोरली जाते.

मंडळी या फेक बातम्या फेसबुक आणि ट्विटर वरून पसरवल्या जात आहेत. या बातम्या दिसल्या तर तिथून काढता पाय घ्या. शेअर करू नका आणि क्लिक करण्याचा विचारही करू नका.

राव, रॉन अॅट्कीन्सन हा सायबर गुन्हेगारांचा चाहता नट असावा. पण अशा अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना सोशल मिडीयावर मारण्यात आलेलं आहे. यात आपले मराठी कलाकार सुद्धा आले बरं का. काही वर्षांपूर्वी सचिन खेडेकर एका कार अपघातात वारले ही बातमी आली होती. यात सर्वात फेवरेट आहेत नाना पाटेकर. त्यांना तर अनेकदा मृत्यूला समोर जावं लागलंय.

आपण अशा बातम्या तपासून पाहूनच पसरवल्या पाहिजेत.

 

आणखी वाचा :

शनिवार स्पेशल : ‘मिस्टर बिन’ बद्दल या १० गोष्टी माहित आहेत का ?

सिनेमागृहाच्या सीटखाली एड्सवाली सुई, वाचा फेक मेसेजमागचं व्हायरल सत्य !!

पेटीएम पेमेंट बँक: अफवा किती आणि सत्य काय ?

फेसबुकवर नवीन अफवा पसरली आहे कि तुमचे सगळे अपडेट्स पब्लिक होणार

युनेस्कोने मोदींची निवड बेस्ट पी. एम म्हणून केली आहे या अफवेला तुम्ही बळी पडलात ना ?

 

सबस्क्राईब करा

* indicates required