आता भारतीय आदिवासी भाषाही विकिपिडियावर...पहिली भाषा कोणती माहित आहे ?

भारतात प्रामुख्याने बोलली जणारी आदिवासी ‘संथाली’ भाषा आता विकिपीडियाच्या मोजक्या भारतीय भाषांच्या यादीत जाऊन बसली आहे. विकिपीडिया मध्ये माहितीचा भांडार आहे हे तर आपल्याला माहित आहेच. ही माहिती वाचण्यासाठी आपण आपल्याला हवी ती भाषा निवडू शकतो. पण आजवर एकाही भारतीय आदिवासी भाषेतून विकिपीडियावरची माहिती वाचता येत नव्हती. आज ते शक्य झालेलं आहे राव. भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

स्रोत

संथाली भाषा भारतातील आदिवासी भाषा आहे. भारतात झारखंड, ओडीसा आणि पश्चिम बंगाल भागात ६४ लाख लोकांची ती प्रमुख बोली भाषा आहे. याशिवाय नेपाळ आणि बांगलादेशातही ती बोलली जाते. संथाली भाषेला जिवंत ठेवण्यासाठी सध्या अनेक प्रयत्न चालू आहेत. त्यातलाच हा एक प्रयत्न.

२८ जुलै रोजी विकिमिडिया फौंडेशन तर्फे संथाली भाषेला हिरवा कंदील मिळाला आणि २ ऑगस्ट पासून ती विकिपीडिया मध्ये सामील करण्यात आली. भारत, बांगलादेश आणि नेपाळ मधल्या जाणकारांनी संथालीला विकिपीडियावर आणण्यासाठी मोठी मदत केली.

स्रोत

संथालीच्या विकिपीडिया एडिशन मध्ये ७०,००० शब्दांची माहिती साठवण्यात आली असून ही माहिती ‘ओलचीकी’ या लिपीत लिहिली गेली आहे. संथाली भाषा लिहिण्यासाठी ‘ओलचीकी’ लिपी वापरण्याची पद्धत आहे. याच लिपी मध्ये उत्तर पूर्वेतील काही मोजक्या आदिवासी भाषा लिहिल्या जातात.

आम्ही आधीच म्हटल्या प्रमाणे संथाली भाषा टिकवण्यासाठी आज पर्यंत सुरु आहेत. आदिवासी परिषदेकडून संथालीचे वर्कशॉप घेतले जात आहेत. संथाली भाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. याच प्रयत्नांमुळे यावर्षी पहिल्यांदा पश्चिम बंगलाच्या जवळजवळ १०० विद्यार्थ्यांनी १० वीच्या बोर्डाच्या परीक्षा संथाली भाषेतून दिल्या. एवढंच नाही तर २०१७ मध्ये शिखा मंडी ही पहिली संथाली भाषेतील रेडीओ जॉकी बनली आहे.

मंडळी, भाषा टिकवण्यासाठीचे हे प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required