सौदी अरेबियात झाला विना मॉडेलचा 'घोस्ट फॅशन शो'!

सौदी अरेबियात आणि तिथले महिलाविषयक कायदे तर आपल्या सर्वांना माहित आहेतच. आता २०१८च्या जुलैमध्ये त्या एकदाच्या गाड्या चालवू शकणार आहेत असं म्हणतात. प्रत्यक्षात काय होईल हे काळच सांगेल. पण सध्या जगभर चर्चा चालू आहे तिथे झालेल्या एका फॅशन शो ची.

या शो मध्ये चक्क मॉडेल्सना फाटा देण्यात आला होता. मग कपडे कसे दाखवले? अहो, कपडे हँगरला अडकवले आणि तो हँगर ड्रोनच्या साहाय्याने रॅम्पवर फिरवला!! आहात कुठं! 

 

या कार्यक्रमाच्या आयोजकांचं म्हणणं आहे की त्यांचा हा शो रमझानसाठी एकदम योग्य आहे. कारण शोमध्ये स्त्रियांचं नखही दृष्टीस पडत नाही. पण ही कल्पना काही सगळयांना रुचलेली दिसत नाही, अर्ध्यापेक्षा अधिक हॉल रिकामाच दिसतोय. 

मंडळी, जग चंद्रावर गेलं तरी ही लोकं उंदरावरच आहेत. तुम्हांला या घटनेबद्दल काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required