३५ वर्षे काम केल्याबद्दल अरब परिवाराने अशी केली भारतीय कामगारांच्या कामाची परतफेड!!

८० च्या दशकात दुबईच्या नोकरीचं फॅड आलं होतं. याच दरम्यान सौदीत गेलेल्या ‘मिडो शिरीयन’ यांनी तिथे ३५ वर्ष काम केलं. नुकतंच त्यांची निवृत्ती झाली. पण निवृत्तीच्या दिवशी एका साध्या कामगारासाठी सौदी कुटुंबाने आयोजित केलेला निरोप समारंभ डोळे दिपवणारा होता.  

स्रोत

मंडळी, मिडो शिरीयन’ उर्फ मिडू बाबू हे गेल्या ३५ वर्षापासून ‘अवाद खुदैर अल शेम्मारी’ या सौदी परिवारासाठी काम करत होते. त्यांनी तिथे शेतीची कामे केली व सोबतच हेल आणि अल जौफ या डोंगराळ भागातल्या परिवाराच्या मालकीच्या हॉटेल मध्ये वेटर म्हणूनही काम केलं.

३५ वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यासाठी सौदी परिवाराने एक खास समारंभ आयोजित केला होता. त्यावेळच्या एका व्हिडीओ मध्ये अवाद खुदैर अल शेम्मारी परिवारातील प्रत्येकजण रांगेत उभा राहून मिडू बाबुला निरोप देताना दिसत आहे. या परीवारातील प्रत्येकाने मिडू बाबुंसाठी खास गिफ्ट्स आणले होते.

मंडळी, समारंभ आणि गिफ्ट्स सोबत मिडू बाबूंना भरगच्च पेन्शन आणि भेटीदाखल आणखी रक्कम देण्यात आली आहे. ३५ वर्ष काम केल्यानंतर आता ते आनंदाने आपल्या घरी परतू शकतात.

सबस्क्राईब करा

* indicates required