आता फेसबुक पासून तुमचं लोकेशन लपवता येणार...या सोप्प्या स्टेप्स पाहून घ्या !!

तुम्हाला सगळ्यांनाच हे माहित असेल की फेसबुक उघड उघड आपल्यावर लक्ष ठेवून असतं. तुमच्या आवडीनिवडी सहित तुम्ही कुठे आहात याबद्दलही फेसबुक माहिती साठवत असतं. आता गंमत अशी आहे की जेव्हा तुम्ही फेसबुक अॅप वापरत नसता तेव्हाही अॅप चं काम चालूच असतं.

तुमच्या मोबाईल मधील लोकेशन सेटिंग जर ऑन असेल तर फेसबुक अॅप वापरात नसतानाही आपलं लोकेशन साठवण्याचं काम करत असतं. याला म्हणतात Background Location Data. त्यामुळे बऱ्याचदा फेसबुक वापरात नसूनही आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेलेलो असू तर त्या जागेशी निगडीत जाहिराती आपल्याला दिसू लागतात.

स्रोत

म्हणजे फेसबुक आपल्यावर सतत नजर ठेवून असतं का ? तर उत्तर आहे ‘हो’. पण घाबरू नका. फेसबुकपासून आपलं लोकेशन लपवणं आता शक्य झालं आहे. तुम्ही जर Android युझर असाल तर तुम्हाला हे सहज शक्य आहे. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

फेसबुकला आपल्या लोकेशनची माहिती मिळू नये यासाठी फोनचं लोकेशन सेटिंग बंद ठेवणे हा एक सोप्पा ऑप्शन आहे, पण त्यामुळे फेसबुक सहित इतर सगळ्या अॅप्सचं लोकेशन फिचर बंद होईल. तर यासाठी खास फेसबुकचं background location data बंद ठेवण्यासाठी एक नवीन सेटिंग फेसबुकने अपडेट केली आहे. यासाठी पुढील स्टेप्स पाहा.

१. फेसबुक अॅपच्या  'Settings and Privacy' सेक्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला समोर नवीन ऑप्शन्स दिसतील. त्यातील 'Settings’ वर क्लिक करा.

२. 'Settings' मध्ये जाऊन ‘Privacy’ सेक्शन मधल्या ‘Location’ या पर्यायावर क्लिक करा.

३. ‘Location’ ऑप्शनमध्ये 'Background Location'वर क्लिक करून तुम्ही  'Background Location' ऑफ करू शकता.

स्रोत

मंडळी, iOS युझर्सनाही हे शक्य आहे. iOS युझर्स अॅप वापरात असताना लोकेशन शेअर करायचं की नाही हे ठरवू शकतात. यासाठी iOS युझर्स लोकेशन सर्व्हिस ऑप्शन मध्ये जाऊन ‘Allow’ किंवा 'Don't allow' या पर्यायांपैकी एकाची निवड करू शकतात.

चला तर करून बघा या गोष्टी आणि फेसबुकची हेरगिरी बंद करा !!

 

फेसबुकपासून लोकेशन लपवाल हो मंडळी. पण गुगल मॅप्सचे लोकेशन चालू असेल तर काय होतं ते इथं वाचा आणि गेल्या चार-पाच वर्षांत तुम्ही कोणत्या तारखेला कुठे होतात ते ही पाहा.

तुम्ही कुठं जाता याची सगळी माहिती गुगल मॅप्सकडे आहे. तुम्हीच पाहा गेल्या वर्षभरात तुम्ही कुठल्या ठिकाणांना भेट दिली ते..

सबस्क्राईब करा

* indicates required