हा नवीन बजरंगबली पाहिलात? आता वाचा त्याच्या मागची खरी गोष्ट!!

अंगार फुलल्यासारखे डोळे, रांगडा आणि दैवी गुणांनी भरलेला भगवा चेहरा सध्या कित्येक वाहनांवर दिसून येतोय. हा चेहरा आहे राम भक्त हनुमानाचा. हनुमानाच्या नेहमीच्या चेहऱ्यापेक्षा हा चेहरा वेगळा आणि ‘अँग्री’ दिसतोय. नुकतीच हनुमान जयंती होऊन गेली तेव्हापासून हा चेहरा गाडीच्या मागच्या काचेवर दिसून येत आहे. पण हा चेहरा बनवला कोणी? कोणत्या कलाकाराची ही भन्नाट कला आहे. चला माहित करून घेऊया.

स्रोत

‘करन आचार्य’ या केरळच्या ग्राफिक डिझाईनरने हा नवीन हनुमान तयार केला आहे. खरं तर त्याने हे डिझाईन २०१५ साली तयार केलं होतं. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला त्याच्या मित्रांनी ग्रुपचा ध्वज डिझाईन तयार करण्याचं काम दिलं होतं. या ध्वजावर हनुमानाचा चेहरा असणार होता. पण त्यांना नेहमीपेक्षा वेगळ्या बजरंगबलीची अपेक्षा होती. यातूनच हा नवीन ‘अँग्री हनुमान’ साकार झाला. 

हा चेहरा खऱ्या अर्थाने एक रुबाबदार आणि संकटमोचन हनुमानाचं प्रतिक आहे. २०१७ साली बंगलोर भागात हे डिझाईन व्हायरल झालं. कारच्या मागच्या बाजूला किंवा इतर गाड्यांवर तो दिसू लागला. यावर्षी हा हनुमान उत्तर भारतात, महारष्ट्रात देखील पाहायला मिळतोय. 

स्रोत

काही लोक याला राजकीय रंग देतायत, पण करनने सांगितल्याप्रमाणे त्याने असल्या कोणत्याही कारणासाठी ही कलाकृती तयार केलेली नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required