राणीच्या हरवलेल्या हृदयाचं रहस्य...!!

मंडळी, महान व्यक्तींच्या खाजगी वस्तू सांभाळून ठेवण्याची पद्धत सर्वत्रच दिसून येते. त्या व्यक्तीने वापरलेले कपडे किंवा त्याच्या जीवनकाळातील महत्वाच्या क्षणी वापरलेली वस्तू जतन केले जाते. महात्मा गांधींचा चष्मा हे याचंच उदाहरण.

मंडळी, महान व्यक्तींचे कपडे, वस्तू, केस, तलवारी, पुस्तके इत्यादी जपून ठेवण्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या राणीबद्दल सांगणार आहोत जिचं चक्क हृदय जपून ठेवण्यात आलेलं आहे. खरोखरचं हृदय बरं का ?

आता समस्या अशी आहे की नुकतंच काही चोरांनी हे हृदय चोरलंय. या निमित्ताने आम्ही तुम्हाला या राणीची आणि तिच्या हृदयाची ओळख करून देणार आहोत.

चला तर जाऊया इतिहासात थोडं मागे...

स्रोत

या राणीचं नाव आहे ‘अॅन ऑफ ब्रिटनी’. अॅन फ्रान्सची राणी होती. तिचा जन्म १४७७ साली फ्रान्सच्या नॅन्तेस येथे झाला. तिची आई तिच्या लहानपणीच गेली. आई नंतर वयाच्या ११ व्या वर्षी तिचे वडील देखील गेले. तिच्या वडिलांच्या जाण्यानंतर राज्याला पुरुष सत्ताधीश उरला नाही. त्याकाळातील प्रथेनुसार जर राज्य करण्यासाठी शाही कुटुंबात पुरुष नसेल तर राजघराण्यातील स्त्रीला राणी म्हणून घोषित करण्यात येई.

मंडळी, अशा पद्धतीने अॅन फ्रान्सची राणी बनली. तिने सुरुवातीपासूनच साहित्य, संगीत, नृत्य आणि कलाकुसर यात प्राविण्य मिळवलं होतं. ती सुंदर देखील होती. तिच्या बद्दल आज जे दस्तऐवज उपलब्ध आहे त्यावरून असं दिसतं की अॅन एक अत्यंत बुद्धिमान स्त्री होती. तिने राजकारभार चोख केला. राज्याबाहेरील शत्रूंशी शांतता प्रस्थापित करण्याचे तिने प्रयत्न केले. बुद्धिमत्ता आणि सौंदर्याचा ती मिलाफ होती. त्यामुळे ती लोकांमध्ये प्रसिद्द झाली.

स्रोत

तिने चार्ल्स नामक युवकाशी लग्न केले जो पुढे फ्रान्सचा राजा झाला. तो ‘चार्ल्स आठवा’ म्हणून प्रसिद्ध आहे. हे लग्न फक्त ७ वर्ष टिकलं. त्यानंतर तिने बारावे लुई याच्याशी विवाह केला. लुई हा सत्तेच्या हव्यासापोटी तिच्याशी विवाहबद्ध झाला होता. हेही लग्न फारकाळ टिकलं नाही कारण काहीच वर्षात अॅनने जगाचा निरोप घेतला होता.

स्रोत

१५२४ साली अवघ्या ३६ व्या वर्षी तिला मृत्यूने गाठलं. या तरुण राणीची आठवण म्हणून लोकांनी तिचं हृदय जपून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे १०० ग्राम वजन असलेलं ६ इंच महिरापात हे हृदय कायमचं जतन करून ठेवण्यात आलं. हे हृदय आजतागायत वस्तुसंग्रहालयात जपून ठेवण्यात आलेलं होतं. पण आता ते चोरांच्या हाती लागलेलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required