फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्विटर वापरण्यासाठी लागणार टॅक्स ??...पाहा बरं कोणत्या देशात आहे हा कायदा !!

राव, सोशल मिडियाचा वापर कमी व्हावा म्हणून युगांडा देशांने एक विचित्र टॅक्स लागू केला आहे. हा टॅक्स आहे 'सोशल मिडिया टॅक्स'. युगांडाच्या नागरिकांना १ जुलै पासून सोशल मिडियाचा वापर करण्यासाठी टॅक्स भरावा लागणार आहे.

मंडळी, सोशल मिडिया साईटचा वापर करण्यासाठी युगांडा मध्ये प्रत्येक दिवसाला २०० शिलिंग म्हणजे ३.७५ रुपये आकारले जाणार आहेत. युगांडाच्या सरकारला असं वाटतं की सोशल मीडियामुळे ‘गॉसिप’ची सवय लागते. (जे खरं आहे.) या सवयीमुळे लोकांचा वेळ आणि पैसा टाईमपास करण्यात वाया जातो. त्यामुळे या टॅक्सच्या माध्यमातून सोशल मिडियाच्या वापरावर रोख लावण्याचा हा प्रयत्न आहे.

राव, युगांडा मध्ये ही काही पहिली वेळ नाही. २०१६ च्या निवडणुकीत युगांडा मध्ये सर्व सोशल मिडिया साईट आणि अॅपवर बंदी घालण्यात आली होती. देशातील कोणत्याही नागरिकाला व्हाट्स अॅप, फेसबुक, ट्विटर वापरता आलं नव्हतं.

युगांडा बरोबर पापुआ न्युगिनीने देशात १ महिन्यासाठी फेसबुक ब्लॉक करणार असल्याची घोषणा केली होती. अशाच आणखी काही देशांनी सोशल मिडियावर या ना त्या मार्गाने बंदी घालण्याच्या प्रयत्न केलेत.

राव, तुम्हाला काय वाटतं, आपल्या देशात पण हा कायदा लागू केला पाहिजे का ?

सबस्क्राईब करा

* indicates required