ही गुहा तयार व्हायला लागले तब्बल ६००० वर्ष !! चला जाऊया मार्बल केव्हच्या सफरीवर !!!

निसर्गाच्या अद्भुत कलाकृतीचं दर्शन जगभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. मंडळी, माणसाने कितीही अनोखी कलाकृती घडवली तरी निसर्गापुढे ती फिकीच पडनार. आता आपल्या भारताचा शिरोमणी असलेला हिमालय घ्या राव. हिमालयाकडे बघून निसर्गाच्या विराट रूपाचं दर्शन घडतं.

मंडळी आज अशाच एका अद्भुत नैसर्गिक कलाकृतीला घेऊन आम्ही आलो आहोत. ही कलाकृती म्हणजे दक्षिण अमेरिकेतली ‘मार्बल केव्ह’. मार्बल केव्ह म्हणजे संगमरवराची गुहा.

आर्जेन्टिना आणि चिलीच्या मधोमध पांतागोनिया जवळ असलेली संगमरवरी गुहा निसर्गाचं अनोखं रूप दाखवून देते. चिली मधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे सरोवर General Carerra च्या मधोमध ही गुहा आहे.  तुम्ही खालील फोटोत गुहेची झलक पाहू शकता.

राव तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज ज्या रुपात ही गुहा दिसते त्या रुपात येण्यासाठी तब्बल ६००० वर्षांचा कालावधी जावा लागला. संगमरवरात असलेला कॅल्शियम कॅर्बोनेटवर सरोवरातील पाण्याच्या माऱ्याने गुहेला आजचा आकार मिळाला.

राव, आणखी एक आश्चर्य म्हणजे गुहेचा रंग निळा दिसत असला तरी हा रंग पाण्याच्या प्रमाणानुसार व हवामानानुसार बदलत राहतो. गुहा तर अद्भुत आहेच पण तिथला निसर्ग सुद्धा तेवढाच नयनरम्य आहे. आता प्रत्येकालाच दक्षिण अमेरिकेला जाता येणार नाही म्हणून आम्ही तुम्हाला घर बसल्या मार्बल केव्हाची सफर घडवणार आहोत.

चला तर मग या गुहेचे काही खास फोटो पाहूयात...

स्रोत

स्रोत

स्रोत

स्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required