या प्रोफेसर काकांच्या डान्सचा व्हिडीओ पाह्यलात का मंडळी ? तुम्हाला पण घ्यायचंय का यांचं डान्स चॅलेंज ?

मंडळी काही दिवसापासून एका काकांच्या डान्सचा व्हिडीओ जबरी व्हायरल होतोय. सोशल मिडीयावर रातोरात व्हाराल झालेल्या व्यक्तींपैकी ते सध्या टॉप वर आहेत भाऊ. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ आहेच इतका भारी की तो व्हायरल होणारच होता राव. हा व्हिडीओ तुम्ही सुद्धा नक्कीच पहिला असेल.

गोविंदालाही टफ देईल अशा त्यांच्या डान्स स्टेप्स आहेत भाऊ. 'दिल बहलता है मेरा’ या गाण्यावर त्यांचे पाय अफलातून थिरकलेत. त्यांच्या डान्सची वाह वाह होत आहे. पण हे काका आहेत तरी कोण ?
चला जाणून घ्या.

या काकांचं नाव संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बू अंकल आहे. सध्या ते मध्यप्रदेशच्या विदिशा भागात राहत असून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात. त्यांना मिथुन आणि गोविंदाच्या डान्स स्टाईलने कॉलेजच्या दिवसापासून वेड लावलं आहे. त्यांनी गोविंदाच्या गाण्यांवर कोलेज मध्ये असताना डान्स देखील केला होता. पुढे त्यांनी डान्स सोडला पण त्यांच्यातला डान्सर काही गेला नाही राव.

१२ मे रोजी त्यांच्या मेहुण्याचा लग्नाच्या संगीताचा कार्यक्रम होता त्यावेळी त्यांच्यातील गोविंदाने पुन्हा एकदा उचल खाल्ली. तोच हा व्हायरल व्हिडीओ. या व्हिडीओ नंतर पब्लिक डिमांडवर त्यांचा दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला. या दुसऱ्या व्हिडीओत त्यांनी ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी’ या गाण्यावर डान्स केला आहे. दोन्ही व्हिडीओने त्यांना रातोरात फेमस केलंय राव. 

मंडळी, या काकांनी तर एकदा ह्रितिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या गाण्यावर डान्स केला होता म्हणे. पुढचा व्हिडीओ याच गाण्याचा असू शकतो. स्टे ट्यून्ड !!

राव, डान्सिंग डब्बू अंकलला एका मुलीने कॉपी केलंय. तिचा व्हिडीओ सुद्धा बघून घ्या. आणि सांगा कोणी बेस्ट डान्स केलाय !!

 

सबस्क्राईब करा

* indicates required