व्हॉटसअँप अपडेट : व्हॉट्सअॅपने दिली भारतीयांना शिक्षा !! आता मेसेज १० जणांना फॉरवर्ड करता येणार नाही !!

मंडळी, भारतात फेक मेसेजेस फॉरवर्ड केल्याने काय गदारोळ माजू शकतो, हे मागील काही आठवड्यात आपण पाहिलंच असेल. महाराष्ट्रात आणि भारतातल्या इतर भागात मुलं पळवण्याच्या संशयावरून अनेकांची हत्या झाली, अनेकजण जखमी झाले. राव, या बातम्यांनी व्हॉट्सअॅपला गदागदा हलवून जागं केलंय. त्यांनी खास भारतासाठी व्हॉट्सअॅप अॅपमध्ये काही बदल केलेत. 

राव, हे बदल चांगले असले तरी त्याचा आनंद साजरा करू शकत नाही. कारण ही भारतीयांच्याच कर्तृत्वामुळे मिळालेली शिक्षा आहे. चला आता बघून घ्या हा बदल आहे तरी काय !!

स्रोत

आता व्हॉट्सअॅपवर फक्त ५ लोकांना मेसेज फॉरवर्ड करता येईल. व्हॉट्सअॅपने फॉरवर्ड मेसेजेसला आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेतलाय. टेक्स्ट मेसेज, फोटो किंवा व्हिडीओच्या उव्या बाजूला असलेला फॉरवर्डचा बाणही काढून टाकण्यात येईल असं व्हॉट्सअॅपने म्हटलंय. इथेच न थांबता व्हॉट्सअॅपने आपल्यावर आणखी एक प्रयोग करण्याचं ठरवलंय. व्हॉट्सअॅपवाले चाट लिमिटसुद्धा ५ वर आणणार आहेत भौ. हे सगळे नियम फक्त आणि फक्त भारतीय युझर्सना लागू होतील.  कारण भारतात जेव्हढे मेसेज फॉरवर्ड होतात तेवढे अख्ख्या जगात कुठेही होत नसतील.

व्हॉट्सअॅपने अधिकृतरीत्या म्हटलंय की आम्ही हा बदल ‘चाचणी’ म्हणून करत आहोत. जर फेक न्यूज पसरवणं आटोक्यात आलं तर कदाचित हे निर्बंध उठू शकतात. 

आधी गुगलला भारतीयांच्या गुड मॉर्निंग मेसेजेसमुळे गुगलला त्या इमेजेस स्टोअर करण्यासाठी खास अल्गोरिदम शोधावा लागला होता आणि आता हे प्रकरण!!

राव, या बातमीने जगभरात आपली नामुष्की झाली आहे हे मात्र खरं.

 

आणखी वाचा : 

भारतीयांच्या 'गुड मॉर्निंग'ने गुदमरले गुगल...गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवण्याआधी हे एकदा वाचाच !!

अॅॅडमिनदादा आणि ताई, सावधान ! तुमच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये आता येणार आहे पोलिसमामा !!

व्हॉट्सऍपवर ब्ल्यू टिक बंद केली आहेत?? आता या ट्रिकमुळे लोकांना तरीही कळेल तुम्ही मेसेज वाचला की नाही...

का आहे हाईक मेसेंजर व्हाट्सअॅप पेक्षाही वरचढ? : वाचा हाईक वर मिळणाऱ्या या १० अनोख्या फीचर्स बद्दल...

खोट्या WhastApp वेबसाईटपासून सावधान...

फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्विटर वापरण्यासाठी लागणार टॅक्स ??...पाहा बरं कोणत्या देशात आहे हा कायदा !!

नवरीच्या नावाने नवऱ्याला केलं बेजार....काय आहे ते नाव, पाहा बरं !!

आता व्हॉट्सअॅपवरच्या डिलीट केलेल्या फाईल्सही पुन्हा मिळवा...

व्हॉट्सअॅप हँग करणारा मेसेज आलाय ? फिकीर नॉट, हे आहे त्यामागचं साधं कारण...

तुम्ही व्हॉट्सऍपवर काय करता ते आता फेसबुकला कळणार, हे टाळण्याचा एक उपाय आहे.

 

सबस्क्राईब करा

* indicates required