व्हॉटसअँप अपडेट : व्हॉटसअँप वर येणार आहेत हे दोन धमाकेदार फिचर्स !!

मंडळी, रात्री व्हॉटसअॅप वर चॅट करताना डोळ्यांना त्रास होतो का ? चादरीत लपून चॅट करणाऱ्यांना तर चष्मा पण लागलाय भाऊ. तुम्हाला सुद्धा याच समस्या भेडसावत असतील तर तुमच्या समस्या सुटल्याच म्हणून समजा. व्हॉटसअॅप लवकरच ‘डार्क मोड’ नावाचं नवीन फिचर घेऊन येणार आहे. या फिचरमुळे व्हॉटसअॅप डार्क मोड मध्ये जाऊन प्रखर उजेडामुळे होणारा त्रास कमी होईल. रात्री चॅट करणाऱ्यांची बल्लेबल्ले होईल राव. युट्युब, ट्विटरच्या अॅप मध्ये डार्क मोड फार पूर्वीपासून आहे. 

स्रोत

व्हॉटसअॅप च्या आणखी एका अपडेटची सध्या चर्चा होत आहे. व्हॉटसअॅप लवकरच Swipe To Reply हे फिचर आणणार असून या फिचरमुळे विशिष्ट मेसेजला लगेचच रिप्लाय देता येणार आहे. अँड्रॉइड मध्ये सध्या असलेलं ‘रिप्लाय फिचर’ वेळखाऊ आहे राव. आधी मेसेज होल्ड करून ठेवा मग रिप्लाय बटन येण्याची वाट बघा. Swipe To Reply मुळे एका स्वाईप मध्ये रिप्लाय देता येईल. हे फिचर सध्या व्हॉटसअॅपच्या ios व्हर्जन मध्ये उपलब्ध आहे. मग अँड्रॉइड का मागे राहील ? लवकरच अँड्रॉइड व्हर्जन मध्ये सुद्धा Swipe To Reply वापरता येईल.

युझर्सना दर नवीन व्हर्जनच्या द्वारे आणखी चांगला चॅटिंग अनुभव देण्यासाठी व्हॉटसअॅप नेहमीच काम करत असतं. या दोन फीचर्समुळे व्हॉटसअॅप वापरणं आणखी सोप्प होणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required