या झाडाला ‘मर्डर ट्री’ का म्हणतात ? माहिती वाचून घाम फुटेल भौ !!

मंडळी, जगात अनेक विषारी झाडे झुडपे आढळतात. आपल्या बेअर ग्रील्स भाऊने त्याच्या कार्यक्रमातून अनेकदा अशा झाडांची माहिती दिली आहे. मंडळी आज आपण अशाच एका झाडाची माहिती वाचणार आहोत. हे झाड दिसायला साधारण झाडासारखं असलं तरी आहे फार विषारी. फक्त विषारी नाही तर या झाडाला ‘मर्डर ट्री’ म्हटलं जातं.

चला या झाडाबद्दल अधिक माहित घेऊया.

 

स्रोत

या झाडाचं नाव आहे cerbera odollam. भारत आणि दक्षिण आशियात हे झाड आढळून येतं. हे झाड कुठूनही विषारी वाटत नाही. पण त्याच्या बियांमध्ये खतरनाक विष असतं राव. या बिया असतात त्याच्या हिरव्या फळांमध्ये. या बियामध्ये ‘कार्डियाक ग्लाइकोसाइड’ हे रसायन आढळतं. कार्डियाक ग्लाइकोसाइडमुळे आपल्या हृदयाची गती मंदावते आणि शेवटी मृत्यू होतो.

बी पोटात गेल्यानंतर काही तासांच्या आत माणसाचा जीव जातो. पण त्याआधी शरीरात काही बदल दिसू लागतात. पोटदुखी, अतिसार, हृदयाचे अनियमित ठोके, उलट्या आणि डोकेदुखी. या प्रकारची लक्षणे दिसू लागतात.

तज्ञांच्या मते भारतात आजवर अनेकांनी आत्महत्येसाठी cerbera odollam ची निवड केली आहे. केरळ मध्ये १९८९ ते १९९९ पर्यंत तब्बल ५०० लोकांनी या प्रकारे आत्महत्या केली होती. म्हणून या झाडाला ‘मर्डर ट्री’ म्हणतात का ? नाही !!

स्रोत

या झाडाला ‘मर्डर ट्री’ म्हणण्यामागे वेगळं कारण आहे राव. पहिली गोष्ट म्हणजे या बियांमुळे माणसाचा मृत्यू झाला आहे हे सहजासहजी शोधता येत नाही. ते शोधून काढण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती प्रचंड महाग असते. त्यामुळे डॉक्टरांना जर पूर्णपणे खात्री असेल की या बियांनीच माणसाचा मृत्यू झाला आहे तरच ही प्रक्रिया करता येते. एकंदरीत काय तर आत्महत्येच्या नावाखाली ती हत्या सुद्धा असू शकते.

२००४ च्या एका अहवालानुसार बऱ्याच केसेस मध्ये मृत्यूचं कारण आत्महत्या दिसून येत होती पण खरं तर ती हत्या होती. आश्चर्य म्हणजे cerbera odollamची फळे खाल्ली जाऊ शकतात पण त्या बरोबर चुकून बी सुद्धा खाल्ली गेली तर मात्र जीव जाऊ शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required