येशू ख्रिस्ताच्या मृत्यूदिनाला गुड फ्रायडे का म्हणतात?? इथं आहे त्याचं उत्तर..

आज गुड फ्रायडे आहे. आजच्या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवण्यात आलं होतं. ख्रिस्ती समाजात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही देशांमध्ये तर गुड फ्रायडे हा राष्ट्रीय दुखवटा म्हणून पाळला जातो. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार की दुःखाचा दिवस असूनही या दिवसाला ‘गुड फ्रायडे’ का म्हणतात.

चला तर आज गुड फ्रायडेच्या निमित्ताने या नावाचा उगम पाहूया !!

स्रोत

येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर क्रॉस देऊन त्याला मारझोड करत एका टेकडीवर नेण्यात आलं आणि तिथे त्याला त्याच क्रॉसवर लटकावून त्याचा जीव घेण्यात आला. कॅथलिक समजुतीनुसार या दिवसाला जर्मन भाषेत ‘Gottes Freitag’ म्हणतात ज्याचा अर्थ होतो ‘God's Friday’. या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे गुड फ्रायडे.

पण या समजुतीला खोटं ठरवणारी गोष्ट म्हणजे या दिवसाला जर्मन भाषेत प्रसिद्ध असलेला शब्द आहे ‘Karfreitag’ ज्याचा अर्थ होतो Sorrowful Friday. म्हणजे दुःखाचा दिवस.

आता वळूया दुसऱ्या कारणाकडे जो जगभर मान्य झालेला आहे.

स्रोत

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार गुड फ्रायडे मधल्या “good” चा अर्थ हा “पवित्र असलेला दिन” असा होतो. हा दिवस पवित्र का तर ख्रिस्ती धर्मानुसार पुढील ३ दिवसांनी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. अशा प्रकारे या नावाचा हा वेगळा अर्थ होतो.

मंडळी, गुड फ्रायडेला जगभरात ‘होली फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’, ‘ब्लॅक फ्रायडे’ या नावांनी पण ओळखलं जातं, पण गुड फ्रायडे हे नाव प्रसिद्ध आहे.

स्रोत

कसा वाटला हा लेख ? प्रतिक्रिया नक्की द्या.

 

आणखी वाचा :

बोभाटा ख्रिसमस स्पेशल : जिंगल बेल्स हे गाणं लिहिलं कोणी ? जाणून घ्या त्याच्या मागची कहाणी !!

येशु भारतात आला होता का ? काश्मीर मध्ये येशुची कबर ?

२६ डिसेंबरला 'बॉक्सिंग डे' का म्हणतात...कारण माहित आहे का ?

सबस्क्राईब करा

* indicates required