असं काय घडलं की या जपानी अधिकाऱ्याला प्रवाशांची माफी मागावी लागली ?

समजा तुम्ही मुंबईच्या दादर स्टेशनवर उभे आहात आणि ट्रेन काही मिनिटे लेट आहे. अशावेळी अनाउन्समेंट मध्ये एका बाईंचा आवाज येतो आणि शेवटचे शब्द असतात ‘प्रवाशांच्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’ राव रेल्वे तर्फे जाहीर माफी मागितली जाते पण आपलं समाधान होत नाही कारण जे व्हायचं ते झालेलंच असतं. राव, हे आपल्यासाठी नवीन नाही. मुंबईकरांना हे अगदी रोजचं झालं आहे.

....पण जपान मध्ये हे रोजचं नाही. जपान मध्ये रेल्वे अगदी ठरलेल्या वेळेत हजर असते. आणि कधी उशीर झालाच तर रेल्वे अधिकारी जातीनिशी येऊन प्रवाशांची माफी मागतात. फोटो मध्ये दिसणारा तो भाऊ जपानचा रेल्वे अधिकारी आहे.

स्रोत

राव, आपल्याकडे जसं आपण दोन तीन ट्रेन बदलून प्रवास करतो तसाच प्रवास जपानी लोक सुद्धा करतात. आपल्या सारखच त्यांना सुद्धा वेळेवर ऑफिस गाठायचं असतं. याची सुरुवात रेल्वे पासून होते. त्यामुळे रेल्वे वेळेवर बारीक लक्ष ठेवून असते. गेल्यावर्षी ‘त्सुकुबा एक्स्प्रेस’ २० सेकंद लवकर निघून गेल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांची हात जोडून माफी मागितली होती. यावरून समजतं जपानी रेल्वे जगभरात का नावाजली जाते ते.

स्रोत

मंडळी, रेल्वे अधिकारी माफी तर मागतातच पण त्याच बरोबर प्रवाशांना ‘डीले सर्टीफीकेट’ सुद्धा देतात. हे सर्टिफिकेट ऑफिसमध्ये दाखवल्यानंतर ‘लेट मार्क’ लागत नाही.

राव, वेळ आणि प्रवाशांच्या बाबतीत सतर्क असल्याने जपानी रेल्वे संपूर्ण जगात वेगळी ठरते.

 

आणखी वाचा :

फक्त एका मुलीसाठी ही रेल्वे इतकी वर्षं का धावली ?

सबस्क्राईब करा

* indicates required