या मुलीने त्याला ६५००० मेसेज पाठवले आणि मग...वाचा पुढे काय झाले !!

मुलं मुलींच्या पाठी हात धुवून लागतात पण आजच्या जमान्यात मुली सुद्धा कमी नाहीत राव. याचं एक भारी उदाहरण नुकतंच समोर आलंय. जॅकलिन नावाच्या मुलीने एका मुलाला लग्नासाठी तब्बल ६५००० मेसेजेस पाठवले होते. आता तुम्हाला वाटत असेल तो मुलगा फारच लकी आहे ब्वा....पण गोष्ट एवढी सोप्पी नाही ना भाऊ....

त्याचं झालं असं की, अमेरिकेतल्या अॅरिझोनात राहणारी जॅकलिन गेल्या वर्षी एका मुलासोबत डेटवर गेली होती. पहिल्याच डेट मध्ये तो तिला लय म्हणजे लय आवडला. तिने डेट नंतर त्याच्याशी संपर्क ठेवायला सुरुवात केली. तिला डेटचं रुपांतर लग्नात करायचं होतं. यासाठी ती त्याला वेगवेगळ्या मेसेजेसने गळ घालू लागली.

स्रोत

राव, तिने भरमसाट मेसेजेस केले तरी समोरून काहीच प्रतिसाद येत नव्हता म्हणून तिने त्याला धमकी देणारे मेसेज पाठवले. त्यात तिने लिहिलं, “मला सोडून गेलास तर मी तुझा खून करेन.”. “मला तुझ्या रक्ताने अंघोळ करायची आहे.” एका मेसेज मध्ये तर तिने स्वतःला हिटलर म्हणून घेतलं.

बोला आता....हे असले मेसेज बघून कोणता मुलगा बोहल्यावर उभा राहील. तरी त्याने दमाने घेतलं. पण ही बया इथेच थांबली नाही तर ती त्याच्या घरी जाऊन पोहोचली. तेही हातात चाकू घेऊन. मग मुलाने पोलिसांना बोलावून घेतलं. हे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तिच्या विरुद्द भक्कम पुरावा उभा राहिला. अशा प्रकारे ती तिच्या विकृतपणामुळे जेल मध्ये जाऊन पोहोचली.

स्रोत

“मी त्याच्यावर खूप प्रेम करते...मला त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे...मला त्याच्यात माझ्या आयुष्याचा जोडीदार दिसतो.” असं तिने एका पत्रकाराला सांगितलं आहे. धमकी देणं, मानसिक छळ करणं या आरोपाखाली ती सध्या जेल मध्ये आहे.

याला म्हणतात खऱ्या अर्थाने हात धुवून मागे लागणे.....बरोबर की नाय ?

सबस्क्राईब करा

* indicates required