computer

Techमंत्र : 'रेड मी 6', 'रेड मी A', 'रेड मी 6 Pro' चे धमाकेदार फीचर्स बघून घ्या राव !!

सणासुदीचे दिवस सुरू आहेत. दसरा दिवाळीसारख्या सणांना नवीन खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा असते. पूर्वी अशा सणांचा मुहूर्त साधून गाडी, फ्रीज, वॉशिंग मशीन अशा वस्तू खरेदी केल्या जायच्या, त्यात आणखी एक भर पडलीय… मोबाईल !

जर तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर एक मस्त बजेटफोन्सची रेड मी 6 सिरीज शाओमी कंपनीने आणली आहे. या रेड मी 6 सिरीजमध्ये एकूण तीन फोन आहेत आणि त्यात अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया या तिन्ही फोनची वैशिष्ट्ये…

शाओमी कंपनी आता भारतात बऱ्यापैकी स्थिरावलीय.  त्यांच्या नवनवीन मोबाईल्सची चर्चा नेहमीच होत असते. आता आले आहेत त्याचे लेटेस्ट मॉडेल्स रेड मी 6, रेड मी A, रेड मी 6 Pro. या तिन्ही मोबाईलमध्ये अँड्रॉइड ओरिओ ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सोबतच स्पोर्ट टॉल डिस्प्ले, फेस अनलॉक सुविधासुद्धा आहे. 

किंमत - 

रेड मी 6 ची किंमत आहे 7,999 रुपये.  त्यात 3 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज दिले आहे. यातलेच दुसरे 64 जीबीचे मॉडेल 9,499 रुपयांना उपलब्ध आहे. 

रेड मी 6 A मोबाईल 2 जीबी रॅम/16 जीबी स्टोरेज आणि 2 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज अश्या दोन पर्यायात उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 5,999 रुपये आणि 6,999 रुपये अशी आहे.

शाओमीने रेड मी 6 Pro हे टॉप मॉडेल 10,999 रु. आणि 12,999 रु. अशा दोन प्रकारात सादर केले आहे.  त्यामध्ये 3 जीबी/32 जीबी आणि 4 जीबी/64 जीबी असा फरक आहे.

या सर्व फोन्सच्या किमती पहिल्या दोन महिन्यात स्थिर ठेवल्या आहेत आणि नंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती पाहून या किमती कमी जास्त होऊ शकतात असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

तपशीलवार वैशिष्ट्ये - 

रेड मी 6

- MIUI 9.6 अँड्रॉइड ओरिओ 8.1 व्हर्जन
- 5.45 इंच HD+ स्क्रीन
- ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ प्रोसेसर
- 3 जीबी रॅम, 32/64 जीबी स्टोरेज
- ड्युअल रिअर कॅमेरा (12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल)
- 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 4G VoLTE कनेक्टिव्हिटी 
- वायफाय, ब्लुटूथ, मायक्रो USB, 3.5 mm हेडफोन जॅक
- फिंगरप्रिंट सेन्सर, लाईट सेन्सर, गायरोस्कोप, कंपास.
- 3000 mAh बॅटरी
- आकारमान 147.5x71, जाडी 5x8.3 mm, वजन 146 ग्राम
- ब्लॅक, गोल्ड, रोझगोल्ड आणि ब्ल्यू या चार रंगात उपलब्ध

रेड मी 6 A

- MIUI 9.6 अँड्रॉइड ओरिओ 8.1 व्हर्जन
- 5.45 इंच HD+ स्क्रीन
- ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ प्रोसेसर
- 2 जीबी रॅम, 16/32 जीबी स्टोरेज
- सिंगल 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 4G VoLTE कनेक्टिव्हिटी 
- वायफाय, ब्ल्यूटूथ, मायक्रो USB, 3.5 mm हेडफोन जॅक
- लाईट सेन्सर, गायरोस्कोप, कंपास.
- 3000 mAh बॅटरी
- आकारमान 147.5x71, जाडी 5x8.3 mm, वजन 146 ग्राम
- ब्लॅक, गोल्ड, रोजगोल्ड आणि ब्ल्यू या चार रंगात उपलब्ध

रेड मी 6 Pro

MIUI 9.6 अँड्रॉइड ओरिओ 8.1 व्हर्जन
- 5.48 इंच फुल HD+ स्क्रीन 
- डिस्प्ले नॉच
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, Adreno GPU
- 3/4 जीबी रॅम, 32/64 जीबी स्टोरेज
- ड्युअल रिअर कॅमेरा (12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल)
- 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 4G VoLTE कनेक्टिव्हिटी 
- वायफाय, ब्ल्यूटूथ, मायक्रो USB, 3.5 mm हेडफोन जॅक
- फिंगरप्रिंट सेन्सर, लाईट सेन्सर, गायरोस्कोप, कंपास.
- 4000 mAh बॅटरी
- आकारमान 149.33x71.68, जाडी 6x8.75 mm, वजन 178 ग्राम
- रेड, ब्लॅक, गोल्ड, आणि ब्ल्यू या चार रंगात उपलब्ध

मग, कोणता मोबाईल घ्यायचा विचार आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required