computer

दुबईच्या पळालेल्या राजकन्येशी भारताचा काय संबंध आहे ? एका आंतरराष्ट्रीय वादग्रस्त घटनेचा खुलासा – भाग २

दुबईच्या पळालेल्या राजकन्येशी भारताचा काय संबंध आहे ? एका आंतरराष्ट्रीय वादग्रस्त घटनेचा खुलासा – भाग १

 

आता पर्यंत आपण बघितलं की राजकुमारी आणि तिची मैत्रीण भारताजवळ पोहोचले होते. आता बघूया पुढे काय झाले !!

बोटीवरचे लोक काय घडले म्हणतात?

हार्व आणि टीना यांच्या म्हणण्यानुसार ४ मार्चला गोव्यापासून जवळ असताना त्यांच्या बोटीला अचानक इतर दोन बोटींनी वेढा घातला. त्यात मिलिटरीचा पोशाख घातलेले ८ ते १० सशस्त्र जवान होते. त्यांच्याकडे अत्याधुनिक रायफली होत्या.  जवानांनी बोटीचा ताबा घेतला आणि आणि  त्यांनी सर्व प्रवाशांना मारहाण केली. शेखा लतीफाच्या मुसक्या आवळल्या. ती घाबरून बाथरूममध्ये लपली होती, पण जवानांनी बाथरूममध्ये गॅस बॉम्ब टाकले आणि तिला बाहेर येण्यास भाग पाडले.  सर्वांचे हात आणि डोळे बांधले गेले होते. मारहाण सुरूच होती. अशातच तिथे एक हेलिकॉप्टर आले आणि शेखा लतीफाला बोटीवरून उचलले गेले. ती  "मला दुबईला परत जायचे नाही" असं जोरजोरात ओरडत होती. परंतु तिचे काहीही ऐकून घेतले नाही. हेच शेखाचे शेवटचे दर्शन! इकडे भारतीय कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला यातले काहीही माहीत नाही असे सांगून हात वर केले होते. आता मात्र या सर्व घटनेमधले गूढ चांगलेच वाढले होते…

हार्व जॉबर्टने सांगितलेलं वृत्त

काय मंडळी? ही कुठल्या सिनेमाची कहाणी वाटत आहे ना? पण थांबा! ही कहाणी इथेच संपली नाही… असली पिक्चर तो अभी बाकी है…

ही एवढी मोठी दाबून ठेवलेली घटना आताच का चर्चेत आली माहीत आहे? सध्या एका घटनेवरून बरंच मोठं वादळ उठलं आहे मंडळी. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण तुम्हाला माहीत असेलच आणि या घोटाळ्यातील साक्षीदार असलेल्या मिशेलचे नाव तुम्ही ऐकले किंवा वाचले असेलच. माहित नसेल तर,  मागच्या आठवड्यात या मिशेलला यूएई सरकारने भारताकडे सुपूर्त केले आहे. ‘बिझनस स्टँडर्ड’ या वृत्तपत्राने सरकारवर सरळ आरोप केला आहे, की भारतीय नौदलाचा वापर करून त्यांनी शेखा लतीफाला ताब्यात घेतले आणि तिला यूएईच्या अधिकाऱ्यांकडे परत सोपवले. दोन देशातील राजकीय संबंध सुरळीत ठेवण्यासाठी सरकारतर्फे हे पाऊल उचलले गेले. याच उपकाराला स्मरून त्याची परतफेड करण्यासाठी यूएई सरकारने मिशेलला भारताच्या ताब्यात दिले आहे.

यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काय आहे ?

या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत मंडळी! दुसऱ्या देशाचा कुणी नागरिक आपल्या देशाच्या हद्दीत विनापरवाना पकडला गेला तर त्याच्यावर खटला चालवून त्याला तुरुंगात ठेवलं जातं. लतीफाच्या बाबत ही कायदेशीर कारवाई केली गेली नाही. तिला सरळ बोटीवरून उचलून परत तिच्या देशात रातोरात पाठवण्यात आलंय. आता हे खरं की खोटं ते सरकारलाच माहीत. कारण, या घटनेची आम्हाला कल्पना नाही असे नौदलाचे अजूनही सांगणे आहे. यूएई सरकार तर यावर तोंड उघडण्यासही तयार नाही.

दुसरी गोष्ट, मागच्या बुधवारी लतीफाचा ३३ वा वाढदिवस होता. त्या दिवशी दुबईच्या राजघराण्यातर्फे एक स्टेटमेंट प्रसिद्ध करण्यात आले ज्यात म्हटले होते की,

“राजकुमारी आपल्या घरी सुरक्षित आहे. ती तिच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करत आहे.”

नुकत्याच घडलेल्या “खाशोगी प्रकरणानंतर” या स्टेटमेंटवर कुणाचाही विश्वास बसत नाही. जर ती घरी कुटुंबासोबत सुरक्षित असेल तर तिचा एकही फोटो किंवा व्हिडीओ का प्रसारित केलेला दिसत नाही.

हार्व आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाला होता की,  “ज्या पद्धतीने लतीफाला मारहाण होत होती त्यावरून दुबईमध्ये परत नेण्याऐवजी त्या लोकांनी तिला समुद्रातच मारून फेकून दिले असावे अशी माझी खात्री आहे”

तर मंडळी ही होती कहाणी… आता यातून काही प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे.

शेखा लतीफा जिवंत आहे का ? असेल तर तिला मीडियापुढे/जनतेपुढे का येत नाही ? ती जिवंत असेल तर तिला बंदिवासात ठेवले आहे का ? महिलांना अशी दुय्यम आणि अमानवी वागणूक देणे योग्य आहे का ? तसेच, आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी एखाद्या देशाने लष्करी बळाचा वापर करून एका खाजगी प्रकरणात ढवळाढवळ करणे नैतिकतेला धरून आहे का ?

बघा मंडळी, उत्तर सापडते का…

सबस्क्राईब करा

* indicates required