computer

जपानमध्ये चक्क एक पुणेकर निवडणूक लढवतोय ? कोण आहेत हे गृहस्थ??

मंडळी, जपान मध्ये पहिल्यांदाच एक भारतीय निवडणूक लढवत आहे. आनंदाची बाब म्हणजे हा भारतीय चक्क मराठी माणूस असून तो पुण्याचा आहे. जपानच्या निवडणुकीत एक मराठी गडी उभा राहतोय म्हटल्यावर माहिती तर घ्यायलाच हवी ना भाऊ....चला तर पाहूया कोण आहे हा उमेदवार...

योगेंद्र पुराणिक हे मुळचे पुण्याचे आहेत. १९९७ साली त्यांनी शिक्षणासाठी पुणं सोडलं आणि जपान गाठलं. त्यांनी जपान मध्ये वेगवेगळ्या IT कंपन्यांमध्ये काम केलं. त्यानंतर ते जपानच्या बँकेत कामाला होते. ते गेल्या २१ वर्षापासून जपान मध्ये वास्तव्य करत आहेत. सध्या ते ज्या एडोग्वा भागातून निवडणूक लढतायत त्या भागात राहून त्यांना १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या १० वर्षापासून ते स्थानिक राजकारणात सक्रीय आहेत.

सध्या योगेंद्र पुराणिक निवृत्त झाले आहेत आणि त्यांना जपानच्या एडोग्वा भागात बदल घडवायचा आहे. हा भाग भारताचं मिनी रूप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या भागात तब्बल ४,५०० भारतीय राहतात. या भागासाठी योगेंद्र पुराणिक जपानच्या कॉन्स्टीट्युएंट डेमोक्रेटिक पार्टी तर्फे लढत आहेत.

योगेंद्र पुराणिक निवडणुकीसाठी उभे आहेत हे समजल्यावर भारतीयांचा जपानच्या राजकारणातला आजवरचा सहभाग तपासण्यात आला. आश्चर्य म्हणजे आजवर कोणाही भारतीयाने जपान मध्ये निवडणूक लढवलेली नाही. योगेंद्र पुराणिक हे पहिले भारतीय असणार आहेत. ते महाराष्ट्राचे आहेत याचा जास्त आनंद होतोय.

तर मंडळी, आता मराठी पाऊल जपानच्या राजकारणातही पडलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required