निसर्गाची करणी आणि चक्क झाडाच्या खोडात पाणी?? चमत्कार आहे की फेक व्हिडीओ?

समजा आपण एक झाड कापत आहोत आणि अचानक झाडातून पाण्याचे फवारे उडू लागले तर ? असंच काहीसं कर्नाटकात घडलं. एका ठिकाणी झाडाचा बुंधा कापला जात असताना झाडातून अचानक पाणी उडू लागलं. थोड्यावेळाने तर पाण्याचा झरा वाहू लागला.

लोकांनी याला चमत्कारापासून ते फेक व्हिडीओ पर्यंत सगळं काही म्हटलंय. पण हा खरंच फेक व्हिडीओ आहे का ? आज आपण या मागचं विज्ञान जाणून घेणार आहोत.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभ्यासकांनाही या झाडांने कोड्यात पाडलं. बरीच शोधाशोध केल्यानंतर आता माहिती मिळाली आहे. या झाडाचं शास्त्रीय नाव आहे Terminalia elliptica. मराठीत या झाडाला आईन किंवा अईन म्हणतात.  

अईन हे फार पूर्वीपासून औषधी म्हणून ओळखलं जातं. या झाडाच्या काही प्रजाती कोरड्या हवामानात पाणी साठवण्यासाठी ओळखल्या जातात. झाडाच्या बुंध्यात एका ठराविक प्रमाणात पाणी साठवलेलं असतं. या पाण्याचं प्रमाण तुम्ही व्हिडीओ मध्ये बघूच शकता. असं म्हणतात की पोटाच्या विकारावर हे पाणी गुणकारी असतं. याखेरीज या वैशिष्ट्यामुळे जमिनीखालची पाण्याची पातळी पण वाढते.

स्रोत

अईन हे एक दुर्मिळ प्रकारातलं झाड आहे. पण फार पूर्वीपासून या झाडाचं लाकूड फर्निचर, होड्या, फळ्या बनवण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे या झाडांची संख्या कमी होत गेली आहे.

मंडळी, या झाडाच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा झाडांचं महत्व अधोरेखित होतं. फेब्रुवारी मध्ये आलेल्या एका अहवालानुसार पृथ्वीची परिस्थिती सुधारण्यासाठी माणसाला अब्जावधी झाडं लावण्याची गरज आहे. एवढी झाडं लावणं जाऊद्या, आहेत ती तरी निदान आपण वाचवायला हवीत.

तुम्हाला काय वाटतं ? नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required