computer

या व्यक्तीला तब्बल ४० वर्ष झोप लागली नाही...वाचा विज्ञानाला चक्रावून सोडणारा किस्सा !

मंडळी, परवाच आम्ही एका अशा माणसाची गोष्ट सांगितली होती ज्याने विज्ञानाचा मेंदूकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता. आज आम्ही अशाच एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत. या माणसाची केस पण मेंदूशी निगडीत आहे.

हंगेरीत एक माणूस होता त्याचं नाव पॉल केर्न. या व्यक्तीला तब्बल ४० वर्ष झोप लागली नव्हती. ४० वर्षांनी मृत्युच्या वेळीच तो कायमचा झोपी गेला. त्याला झोप का लागत नव्हती याचं कारण शोधताना वैज्ञानिक चक्राऊन जात होते.

आधी समजून घेऊया याची सुरुवात झाली कशी.

पॉल हा पहिल्या महायुद्धात (१९१४ ते १९१८ पर्यंत) लढला होता. लढाईत त्याच्या कपाळावर एक गोळी लागली होती. या गोळीने त्याच्या frontal lobe ला म्हणजे कपाळाच्या वरच्या भागातील मेंदूला मोठ्याप्रमाणात इजा पोहोचवली होती.

युक्रेनच्या लेम्बर्ग येथे त्याच्यावर उपचार करण्यात आला. उपचारात त्याच्या मेंदूतून गोळी बाहेर काढण्यात यश आलं. सुरुवातीच्या काळात तो कोमात होता. त्याच्या घरच्यांना डॉक्टरने सांगितलं होतं की तो पुन्हा उठण्याची फारच कमी शक्यता आहे. चमत्कार बघा, तो जागा झाला तो कधीही न झोपण्यासाठी. त्या दिवसापासून त्याची झोप नाहीशी ती अखेर पर्यंत. १९५५ ला त्याच्या मृत्यू पर्यंत त्याला निद्रानाशाने पछाडलं होतं. अधूनमधून त्याचं डोकं मात्र दुखायचं.

पॉल हे त्याकाळी फारच दुर्मिळ प्रकरण होतं. या कारणाने युरोपातल्या निरनिराळ्या शास्त्रज्ञानी त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग केले, पण कोणीही भक्कम कारण मांडू शकलं नाही. पॉलवर वर्षभर अभ्यास करणरे डॉक्टर फ्रे यांनी म्हणून ठेवलंय की “उपचार पूर्ण झाल्यानंतर पॉल कधीही झोपला नाही, त्याने कधी झोपण्याची इच्छा पण व्यक्ती केली नाही.”

पॉल युद्ध संपल्यावर सरकारसाठी काम करत होता. त्याच्या न झोपण्याच्या सवयीने त्याच्या कामावर कधीही परिणाम केला नाही. असं म्हणतात की तो रोज झोपण्यासाठी झगडायचा. पुढे जाऊन त्याने याच्याशी जुळवून घेतलं.

तो रोज रात्री २ तासांसाठी डोळे बंद करून पडून राहायचा. खरं तर त्याला झोप लागत नसायची पण तो २ तास डोळे मिटून राहायचा. संशोधकांनी नंतर असा निष्कर्ष काढला की पॉलचा मेंदू स्वतःहून पुरेशी विश्रांती घेऊ शकतो म्हणूनच झोप न झाल्यामुळे त्याच्या कामात अडथळे येत नाही.

मंडळी, पॉलच्या स्वतःच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली त्यावेळी त्याला चक्क एक जांभई आली होती आणि त्यानंतर त्याला तीव्र डोकेदुखीचा त्रास झाला. पुढे जे घडलं ते वरती दिलेलंच आहे.

मंडळी, पॉलला निद्रानाश का झाला होता याचं कारण अजूनही अज्ञात आहे. विज्ञानात असे अनेक विचित्र किस्से आहेत ज्यांचा उलगडा झालेला नाही. बोभाटा असे नवनवीन किस्से तुमच्यासाठी आणतच राहील.

आजचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला, आम्हाला नक्की सांगा !!

 

आणखी वाचा :

आपला मेंदू काय काम करतो याचा शोध या विचित्र अपघातामुळं लागला..

जागरण करून केलेला अभ्यास शरीरासाठी चांगला की वाईट ?? परीक्षेच्या आधी हे वाचा !!

चक्क झोपण्यासाठी १२ लाख रुपये मिळतील ?...नासा मधल्या या अनोख्या नोकरीबद्दल माहित्ये का ?

या 3 प्रयोगातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करू शकता राव !!

अगदी युद्ध चालू असतानासुद्धा हमखास झोप येईल अशा या दोन ट्रिक्स...

सबस्क्राईब करा

* indicates required