नासाची सूर्यावर स्वारी...अनेक रहस्यांचा होणार उलगडा !!

१२ ऑगस्ट २०१८ च्या पहाटे ३ वाजून ३१ मिनिटांनी, अमेरीकेतील केप कार्नीव्हल या अंतराळ संशोधन केंद्रातून "पार्कर सोलर प्रोब" या  यानाने सूर्याच्या दिशेने यशस्वी झेप घेतली. एका छोट्या मोटरच्या आकाराच्या या  प्रोबने  युनायटेड लाँच अलाउयन्स डेल्टा -४ या रॉकेटच्या माध्यमातून अंतराळात सूर्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. 

स्रोत

उड्डाणाच्या पहिल्या चार मिनिटांत डेल्टा - ४ इंजिन बंद होऊन ते प्रोबपासून मोकळे झाले. आणि थोड्याच वेळात सुअर शक्तिच्या जोरावर प्रोबचे मार्गक्रमण यशस्वी सुरु झाली आहे. 

इतर कोणत्याही प्रक्षेपणापेक्षा हे प्रक्षेपण वेगळेच आहे. कारण यान सूर्याच्या दिशेने जसे जाईल, तसतसे बाहेरचे तापमान वाढत जाईल. बाहेर तापमान २५०० अंशाचे असताना यानाच्या आतल्या बाजूस तापमान फारतर ६५०अंशांपर्यंत वाढेल आणि सर्व यंत्रणा सुखरुप असेल. त्यासाठी यानातल्या यंत्रणेवर कार्बनपासून बनवलेल्या साडेचार इंच जाडीचं आवरण दिलं आहे.

प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात , म्हणजे ऑक्टोबरच्या दरम्यान पार्कर प्रोब शुक्राच्या जवळ पोहचून एक जिम्नॅस्टिक्स सारखा जर्क मारून  (या प्रकाराला शास्त्रज्ञ ग्रॅव्हीटी असिस्ट असं म्हणतात)  शुक्राच्या भोवती फेर्‍या मारत सूर्याच्या "करोनाच" अभ्यास करणार आहे.

करोना (स्रोत)

एकूण सात वर्षांच्या भ्रमणकाळात पार्कर सोलर प्रोब शुक्र ग्रहाजवळून सहा वेळा मार्गक्रमण करेल आणि सूर्याजवळून २४ वेळा भ्रमण करेल करेल. हे भ्रमण करत असताना त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमीकमी होत जाईल आणि शेवटच्या टप्प्यात  ते सूर्यापासून ३८ लाख किलोमीटर अंतरावर असेल. या शेवटच्या टप्प्यात या यानाची गती तासाला दरतासाला ४३०००० किलोमीटर इतकी असेल.  आतापर्यंत हा वेग कोणत्याही यानाला शक्य झालेला नाही.

हा अभ्यास कशासाठी ?

सूर्याचा पृष्ठभाग (स्रोत)

सूर्य आणि आपली सूर्यमाला यांच्यात आपसांतच बरीच अशी कोडी आहेत, ज्यांचे आकलन अजूनही झालेले नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा खटाटोप नासा करत आहे. उदाहरणार्थ, सूर्याच्या वरच्या 'करोना'या भागात सूर्याच्या आतल्या  भागापेक्षा ३०० पट उष्णता असते. करोनाचे तापमान २० लाख अंशांपर्यंत पोहचते पण आतला भाग १०,००० अंशापर्यंतच असतो.

हे कसे शक्य आहे ?

सौर वादळ (स्रोत)

सौर वादळे हा एक दुसरा विषय आहे ज्याचे आपल्याला अजूनही आकलन झालेले नाही. सूर्याच्या पृष्ठभागावर अनेक वादळे होतात. या वादळांत इलेक्ट्रॉन्सचे झोत फेकले जातात, चुंबकीय लहरी फेकल्या जातात. हे सर्व संपूर्ण सूर्यमालेत फेकले जाते. त्यामुळे पृथ्वीसारख्या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र बदलते. पार्कर सोलर प्रोबवर यासाठी  चार वेगवेगळी अभियांत्रीकी उपकरणे बसवलेली आहेत जी चुंबकीय क्षेत्र, प्लाज्मा कण, इतर उर्जाभारीत कण आणि  सौरीय वादळ याचा अभ्यास करून डेटा आणि प्रतिमा पृथ्वीवर पाठवतील.

या सौर वादळांचा अभ्यास १९५८ साली युजीन पार्कर या शास्त्रज्ञाने करून काही अंदाज वर्तवले होते जे पुढच्या काळात सिध्द झाले. या संशोधनाचा सत्कार म्हणून सूर्याच्या दिशेने पाठवलेल्या या यानाला Parker Solar Probe असे नाव देण्यात आलेले आहेत. युजीन पार्कर यांचे वय आता ९१ वर्षे आहेत. पार्कर प्रोब अंतराळात पाठवताना त्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आले होते.

जीन पार्कर (स्रोत)

मंडळी, हे सर्व थेट आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत नाही. पण पृथ्वीवरच्या मानव जातीशी येणार्‍या लाखो वर्‍शांशी जोडलेले आहे 

जर ही सूर्यावरची स्वारी यशस्वी झाली तर मानवी जीवनाला निश्चितच एक नविन वळण मिळेल.

 

आणखी वाचा :

जगातली सगळी माणसं अदृश्य झाली तर काय होईल ? पहा हा व्हिडीओ !!

सूर्य अदृश्य झाला तर काय होईल भाऊ ?

काय असते हे लॅंड आर्ट - अर्थ आर्ट?

सबस्क्राईब करा

* indicates required