या विशिष्ट आवाजांनी होणाऱ्या त्रासाला हे आहे वैज्ञानिक कारण !!

शाळेत खडूने लिहिताना किंवा बेंच सरकवताना होणारा आवाज हा अंगावर काटे उभा करणारा असायचा. एखाद्या धातूवरून अणकुचीदार वस्तूने ओरखडा काढणे, सुई ने काचेवर रेघोट्या ओढणे किंवा कागद फाटण्याचा आवाज असेल, या आवाजांच्या नुसत्या विचाराने देखील त्रास होतो. पण मंडळी हा प्रश्न लहानपणापासून पडत आलेला आहे की या ठराविक आवाजांनी आपल्या मेंदूची तार का सटकते ?

याचं उत्तर आपल्या वैज्ञानिकांना प्रश्नात पडलेलं नाही. यावर संशोधनातून पुढील माहिती समोर आली.

स्रोत

एक अभ्यास असं सांगतो की या प्रकारातील आवाजांची फ्रिक्वेन्सी रेंज ही २००० ते ५००० हर्ट्ज असते. या फ्रिक्वेन्सी रेंजच्या स्तरावर आपले कान सर्वाधिक संवेदनशील होतात. आणि म्हणून आपल्याला या आवाजांचा त्रास होतो. पण या विशिष्ट रेंजवर आपले कान संवेदनशील का होतात याचं नेमकं कारण अजून कळलेलं नाही.

या प्रकारच्या आवाजाने नेमकं काय होतं ?

पहिला परिणाम म्हणजे या आवाजाने आपल्या कानांच्या बाह्यपटलावर खळबळ माजते. दुसरा परिणाम म्हणजे मेंदूत असलेल्या Amygdala या केंद्रकावर अशा आवाजाने विपरीत परिणाम होतो. हे केंद्रक आपल्या भाव भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतं. आपण जेव्हा या प्रकारातील आवाज ऐकतो तेव्हा Amygdala केंद्रक सक्रीय होऊन आपल्याला त्रास होतो.

स्रोत

एक दुवा असाही सांगतो की आपल्या पूर्वजांच्या काळापासून आपला मेंदू एका विशिष्ट पातळीवरील आवाजामुळे दक्ष होतो. कदाचित अश्मयुगातील माणसाला या प्रकारच्या आवाजाने संकटाची चाहूल लागत असावी. कालांतराने माणूस प्रगत झाला पण त्या आवाजाने होणारा परिणाम काही गेला नाही.

म्हणजेच ज्या आवाजाने आपली अक्षरशः ‘सटकते’ तो आवाज म्हणजे आपल्याच पूर्वजांनी आपल्या डोक्यात तयार केलेला अलार्म आहे राव.

सबस्क्राईब करा

* indicates required