गुगल झालं जुनं. आता तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला आलाय 'स्मार्ट स्पीकर' !!

मंडळी, कोणतीही माहिती मिळवायची असेल तर आपण गुगलकडे धाव घेतो. गुगलवर हवी ती माहिती एका टिचकीसरशी मिळते. पण गुगलवर सर्च करणं ज्यांना टेक्नोलॉजी हाताळता येते त्या लोकांसाठी सोप्पं आहे हो. इतर लोकांना तर गुगल म्हणजे काय हेच नेमकं माहित नसतं. यासाठी आयआयटी मुंबई आणि स्वानसी विद्यापीठाने एक स्मार्ट आयडिया काढलीय. चला तर जाणून घेऊ, ही भन्नाट आयडिया आहे तरी काय...

स्रोत

मंडळी, सध्या धारावी भागात अनेक दुकानांमध्ये ‘स्मार्ट स्पीकर्स’ बसवण्यात आला आहेत. या स्मार्ट स्पीकरला कोणताही प्रश्न विचारला तर तो लगेच त्याचं उत्तर देतो. अगदी ग्रहताऱ्यांपासून ते भारताचे क्षेत्रफळ, राज्यांची संख्या इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे एका मिनिटात मिळतात. आता सर्वसामान्यांना हे डिव्हाईस वापरता येणार नाही हे ओळखून आयआयटी मुंबईकडून त्यांना प्रशिक्षणही दिलं जातं. 

मंडळी, हे स्पीकर एक प्रयोग म्हणून लावण्यात आले आहेत. आयआयटी मुंबई आणि स्वानसी विद्यापीठाला जाणून घ्यायचं आहे की सार्वजनिक ठिकाणी लोक याला कसा प्रतिसाद देतात. खरं तर हे तंत्रज्ञान इतर देशांमध्ये सर्रास वापरलं जातं. पण आपल्या देशात मात्र हे नवीन आहे. 

मंडळी, लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनाच स्मार्ट स्पीकर्समुळे मोठा फायदा होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे खरी तीच माहिती मिळत असल्याने एकप्रकारे खोट्या बातम्यांना आळा बसू शकतो.

 

आणखी वाचा :

रात्रीच्या वेळी स्पीडब्रेकर दिसण्यासाठी मुंबईकरांनी काढलीय एक भन्नाट शक्कल, तूम्ही तुमच्याही गावात हा उपाय करू शकता !!

सबस्क्राईब करा

* indicates required