तेजस्विनी सावंत : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी मराठमोळी वाघीण !!

लग्न झालं म्हणजे करियर संपलं किंवा वय निघून गेलं म्हणून काही करू शकत नाही अशा समजुतींना एका मराठमोळ्या वाघिणीने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिचं नाव आहे 'तेजस्विनी सावंत'. तेजस्विनीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. संसार आणि करियर यांची योग्य सांगड घालत तिने जी कामगिरी केली आहे त्याला तोड नाही.

तिने कालच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीत रौप्यपदक मिळवलं होतं. आणि आज तिने थेट सोनं लुटलं आहे.

स्रोत

तेजस्विनी सावंतने तिच्या करीयरच्या सुरुवातीलाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदक जिंकलं होतं. २००६ आणि २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तिने अशा प्रकारे आपली चमक दाखवली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांबरोबरच तिने २००९ साली म्युनिक मध्ये ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन विभागात कांस्यपदक जिंकलं. त्याच बरोबर २०१० साली ती म्युनिकमध्येच ५० मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीची वर्ल्ड चॅम्पियन ठरली.

२०१६ साली तिचं लग्न झालं आणि तिच्याकडून असलेल्या सर्व आशा मालवल्या. लग्नानंतर ती पुन्हा पूर्वी सारखं खेळू शकणार नाही किंवा तिचं करियर आता संपलं असं अनेकांना वाटलं. पण तिने लग्नानंतर आपल्या करियरकडे दुर्लक्ष केलं नाही. उलट तिने दमदार कमबॅक करत सर्वांची तोंड बंद केली आहेत.

स्रोत

मंडळी आज आपल्या देशाला अशाच कर्तबगार स्त्रियांची गरज आहे. तेजस्विनीच्या कामगिरीने इतरांना प्रेरणा मिळो अशीच आपण आशा ठेवूया !

महाराष्ट्राच्या या वाघिणीला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required