भारताला मिळाली पहिली महिला अंपायर....जाणून घ्या तिच्या जिद्दीची गोष्ट !!

क्रिकेटच्या मैदानावर आजवर कधी महिला अंपायर बघितली आहे का ? या पुढे नक्की बघाल. कारण, भारताल्या पहिल्या महिला अंपायर मिळाल्या आहेत. 

BCC ने राष्ट्रीय पातळीवरील अंपायरसाठीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेत मुंबईच्या ‘वृंदा राठी’ आणि चेन्नईच्या एन. जननी या दोघी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना महिलांच्या व ज्युनियर मुलांच्या राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आता अंपायर म्हणून काम करता येणार आहे. 

आज आपण जाणून घेणार आहोत वृंदा राठी यांच्या बद्दल !!

स्रोत

वृंदा राठी या २९ वर्षांच्या असून त्या २०१० पासून BCC च्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत आल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक स्थानिक पातळीवरील सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम केलं आहे.

वृंदा राठी यांना अंपायर बनण्याची प्रेरणा मिळाली न्यूझीलंडच्या महिला अंपायर कॅथी क्रॉस यांच्यामुळे. २०१३ सालच्या वूमन्स वर्ल्डकप मध्ये न्यूझीलंडच्या कॅथी क्रॉस या अंपायर होत्या. कॅथी क्रॉस यांना बघताच वृंदा राठी यांना अंपायर म्हणून काम करण्याची कल्पना सुचली. त्यांनी लगेचच स्थानिक व राज्य पातळीवरील अंपायरच्या परीक्षा दिल्या व अत्यंत मेहनतीने त्या पासही झाल्या. त्यांना स्थानिक पातळीवरील सामन्यांत अंपायर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता BCCI च्या लेव्हल २ परीक्षेने त्यांना थेट राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

स्रोत

वृंदा राठी म्हणतात, “एका महिलेच्या अंपायर म्हणून कामगिरीबद्दल अनेकांना संशय होता. पण जेव्हा प्रत्येकाला फक्त मैदानावरील कामाशी घेणंदेणं असतं तेव्हा कोणीही स्त्री-पुरुष असा भेद करत नाही.”

मंडळी, वृंदा राठी आणि एन जननी यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणखी महिला अशा वेगळ्या प्रकारच्या करियरकडे वळतील अशीच आशा बाळगूया.

सबस्क्राईब करा

* indicates required