नॅशनल कॅम्प मधून दंगल गर्ल्सची हकालपट्टी? चौघीही एशियन गेम्सला मुकणार? 

मंडळी, येत्या अॉगष्ट-सप्टेंबर महिन्यात इंडोनेशियातील जकार्ता मध्ये एशियन गेम्स संपन्न होतायत. याच आशियाई स्पर्धेची तयारी म्हणून १० मे पासून लखनौ मध्ये महिला खेळाडूंसाठी नॅशनल कॅम्प आयोजीत करण्यात आलाय. कॅम्पसाठी देशभरातून ५३ महिला कुस्तीपटूंची निवड करण्यात आली होती, पण आठवडा उलटूनही फक्त ३४ कुस्तीपटूंनीच कॅम्पला हजेरी लावलीये!

महत्वाची बाब भारतीय महिला कुस्तीत मोलाचं योगदान देणार्‍या दंगल गर्ल्स गीता, बबीता, रितु आणि संगिता, या चारही फोगट भगिनी कॅम्पला गैरहजर आहेत. यापैकी बबीताने घुडघ्याच्या दुखापतीचं कारण सांगितलंय. दुसरीकडे अॉलीम्पीक मेडलीस्ट कुस्तीपटू साक्षी मलिकने मानेच्या दुखापतीचं कारण देत लवकरच कॅम्पमध्ये सहभागी होऊ, असं आश्वासन दिलं आहे. तर अन्य बर्‍याच महिला कुस्तीपटूंनी परिक्षा आणि आजारी असण्याची कारणं सांगितली आहेत! 

भारतीय कुस्ती महासंघाच्या नियमांनुसार नॅशनल कॅम्पला दांडी मारणाऱ्या खेळांडूंना आगामी बड्या स्पर्धांमध्ये खेळू दिलं जात नाही. आतापर्यंतच्या गैरहजर असलेल्या सर्वच महिला खेळाडूंचा रिपोर्ट मुख्य प्रशिक्षकांनी कुस्ती संघाकडे पाठवलाय. त्यामुळे या बेशिस्त वर्तनाची शिक्षा म्हणून फोगट भगिनींसोबत अन्य गैरहजर महिला कुस्तीपटूंना येत्या आशियाई खेळांना मुकावं लागणार असं दिसतंय... 

सबस्क्राईब करा

* indicates required