आधुनिक शिल्पकलेचे १२ अप्रतिम नमुने!!
शिल्पकला ही भारतात प्राचीन काळापासून आहे. भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून खजुराहो व वेरुळच्या सूर्यमंदिराकडे बघितलं जातं. भारतात जशी शिल्पकला प्रसिद्ध आ,हे तशीच ती जगभरातही आहे. मायकल एन्जेलो हा प्रसिद्ध शिल्पकार तर आपल्याला ओळखीचा आहेच. मंडळी, ही तर झाली इतिहासातील गोष्ट. पण सध्याच्या आधुनिक जगात शिल्पकलेला एक वेगळं रूप मिळालेलं आहे. याचेच काही नमुने आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत.
मंडळी, शिल्पकलेचे हे १० नमुने बघून तुम्हाला वाटेल, ‘यांनी तर आईन्स्टाईन आणि न्यूटन तात्याच्या नियमांना धाब्यावर बसवलं राव.’
चला तर तुम्हीच बघा आता...
१२. वायर फेअरीज - रॉबिन वायट
रॉबिन वायट या कलाकाराने स्टीलच्या तारांपासून हे शिल्प तयार केलं आहे.
११. फ्लोटिंग स्टोन - स्मॅबन अब्बास
हे शिल्प इजिप्तची राजधानी कैरो येथील विमानतळावर आहे.
१०. वूरसा - डॅनियल फिरमन
फ्रान्सच्या 'डॅनियल फिरमन' या कलाकाराने २००८ साली या कलाकृतीची निर्मिती केली. सध्या हा हत्ती पॅरिसच्या 'फाउंटनबाऊ पॅलेस' येथे.
९. Pentateuque - फेबीन मेरेल
८. लेस वायजर्स - ब्रुनो कॅटलानो
ह्या शिल्पातून ब्रुनो कॅटलानो या कलाकाराला कामगारांच आयुष्य दाखवायचं आहे. त्यांच्या शरीराचे भाग न दाखवणं हा त्याच्या मागचा छुपा संदेश आहे.
७. De Vaartkapoen - टॉम फ्रँटझन
हे शिल्प बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथल्या रस्त्यावर आहे.
६. Trans Ī Re - फ्रेडरिक रेड्डम
५. बलन्सिंग स्क्लप्चर By Jerzy Kędziora
४. टेक माय लायटिंग बट डोंट टेक माय थंडर - अॅलेक्स चिने
३. कॉफी कीस - जॉन्सन त्सँग
फोटोत दिसणारं पेय हे चीन मधील 'युआनयांग' आहे जे कॉफी आणि चहाच्या मिश्रणातून तयार होतं. चीनच्या जॉन्सन त्सँग या शिल्पकाराने याच पेयाला धरून हे अप्रतिम शिल्प साकारलं आहे. युआनयांग म्हणजेच चहा आणि कॉफीच्या एकत्रित वापरातून त्याला पूर्व आणि पश्चिमेच्या संस्कृतीला एकत्र आणायचं आहे.
२. फोर्स ऑफ नेचर - लॉरेंझो क्वीन
थायलंड मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर लॉरेंझो क्वीन या शिल्पकाराने निसर्गाची ताकद दाखवणारं हे शिल्प तयार केलं.
१. ब्राँझ शिल्प - भगवान रामापुरे
ही शिल्पकला भगवान रामापुरे या कलाकाराची आहे. भगवान रामापुरे त्यांच्या या अप्रतिम शिल्पांमुळे जगभरात नावाजले गेले आहेत.
आहे की नाही भन्नाट ?