computer

मुंबई मेट्रोचे मार्ग समजून घ्या या रंगांच्या मदतीने, तुम्हांला कुठून-कुठे जावे लागेल ते ही पाहून घ्या

मुंबईतआणि ठाण्यात जवळजवळ सगळीकडेच मेट्रोचं काम चालू आहे. नागरिकांना अजूनही समजलेलं नाही की मुंबई मेट्रोचं जाळं नेमकं कसं असेल. नुकतंच ‘एमएमआरडीए’ ने (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मेट्रोच्या कामाचा आढावा देणारा एक नकाशा जाहीर केलं आहे. या नकाशावरून  मुंबई मेट्रोच्या संपूर्ण जाळ्याची माहिती मिळते.

या नकाशात पहिल्यांदाच मुंबई मेट्रोच्या मार्गीकांना रंग देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, दहिसर आणि डी एन नगर भागांना जोडणाऱ्या मार्गिकेला पिवळा रंग, तर अंधेरी आणि मीरा-भाईंदर भागांना जोडणाऱ्या मार्गिकेला लाल रंग देण्यात आला आहे.

मुंबई मेट्रोच्या मार्गिका आणि त्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या मार्गिका यांचं  एक संपूर्ण चित्र या फोटोत आपण पाहू शकतो. हा फोटो झूम करण्याचा प्रयत्न करू नका. कारण, डिजिटल स्वरुपात उपलब्ध असलेला फोटो कमी दर्जाचा आहे. म्हणूनच बोभाटा तुम्हाला प्रत्येक मार्गिका आणि त्याचा खास रंग सांगणार आहे. चला तर पाहूया.

निळा रंग –  लाईन-१

वर्सोवा ते घाटकोपर

 

आकाशी निळा रंग – लाईन-३

कफ परेड - बीकेसी -  आरे कॉलनी

हिरवा रंग – लाईन-४ + लाईन ४A + लाईन १० + लाईन ११

लाईन ४ : भक्ती  पार्क वडाळा ते  कासारवडवली

लाईन ४A :  कासारवडवली ते गायमुख

लाईन-१० : गायमुख ते शिवाजी चौक

लाईन ११ : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

 

नारंगी रंग – लाईन-५ + लाईन १२

लाईन ५ : ठाणे – भिवंडी – कल्याण

लाईन १२ : कल्याण ते तळोजा

गुलाबी रंग – लाईन-६

लोखंडवाला – जोगेश्वरी – कांजुरमार्ग

 

लाल रंग – लाईन-७ + लाईन-७A + लाईन-९

लाईन-७ : दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व)

लाईन-७A : अंधेरी (पूर्व) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

लाईन-९ : दहिसर (पूर्व) – मीरा भाईंदर

सुवर्ण रंग -  लाईन-८

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

 

जांभळा रंग – लाईन १३

शिवाजी चौक ते विरार

किरमिजी तांबडा रंग – लाईन-१४

विक्रोळी – कांजुरमार्ग – बदलापूर

 

या यादीत सर्वच मार्गिका आलेल्या नाहीत. मुंबई मेट्रोच्या एकूण १६ मार्गिका असणार आहेत. यातील काही तयार झाल्या आहेत तर काही तयार होणार आहेत. याबद्दल सविस्तर माहिती देणारा आमचा हा लेख नक्की वाचा.

 

मुंबई-नव्यामुंबईच्या १६ मेट्रो कुठून-कुठेपर्यंत-कोणती स्टेशन्स सगळी माहिती एका ठिकाणी!!

सबस्क्राईब करा

* indicates required