बोभाटा.कॉम - मराठीतलं पहिलं ‘इन्फोटेनमेन्ट पोर्टल’ - अर्थात ज्ञानरंजन संस्थळ!!!गेल्या काही वर्षांत भारतात स्मार्ट-फोनचा प्रसार झाला आणि त्याच सोबत ‘थ्री-जी’ इंटरनेटचा वापरही वाढला. त्याचा परिणाम म्हणजे मराठीसारख्या प्रादेशिक भाषेतून इंटरनेटवर माहिती शोधण्याचं प्रमाण वाढलं. सोशल मीडियामुळे ह्या माहितीची देवाणघेवाण मातृभाषेतून करणंसुद्धा सोपं झालं.पण ही माहिती एकत्रितरीत्या आणि एकाच क्लिकसरशी मिळवणं आजही अवघड आहे.या पार्श्वभूमीवर आम्ही घेऊन आलो आहोत ‘बोभाटा’. इंटरनेटवर अनेक दिलचस्प गोष्टी वार्याच्या वेगानं पसरत जातात. त्यांच्यापैकी काही निवडक गोष्टी आम्ही तुमच्यासाठी वेचून आणणार आहोत. त्यातही आमचा भर असणार आहे, तो माहितीवर. मनोरंजक स्वरूपात पेश केलेली ्निवडक माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माहितीमध्ये बातम्या, लेख, लिस्टिकल्स (याद्यांच्या स्वरूपातले सोपे लेख), व्हिडिओज् अशा वेगवेगळ्या प्रकारांचा वापर करण्यात येईल.सुरुवातीला यात संकलित माहिती असेल हे खरं. पण हळूहळू ‘बोभाटा’च्या माध्यमातून ‘ओरिजिनल कंटेट’ - अर्थात ताजा नि अप्रकाशित मजकूर - तुमच्यासमोर आणण्याचा आमचा मानस आहे. अर्थात तुमच्या प्रतिसादानुसार आणि आवडीनिवडीनुसार, ‘बोभाटा’च्या व्यासपीठात तुम्हांला हवे तसे बदल सतत करण्यात येतीलच.या साईटच्या लोगो बनविण्यासाठी 'नवीन आठवले' यांनी मदत केली आहे. त्याबद्दल बोभाटा त्यांचे आभार मानते.