कुकीजचा वापरः
संस्थळावर कुकीजचा वापर सेशनची माहिती ठेवण्यासाठी होतो. संस्थळ सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. कोणता सदस्य किती काळ संस्थळावर कार्यरत आहे याची माहिती कुकीजमधून मिळते. याशिवाय संस्थळावर नॅव्हिगेशनची माहिती पहाण्यासाठी पाहण्यासाठी कुकीजचा वापरत वापर होतो. यात फक्त सांख्यिकी विदा जमा होतो, वापरकर्त्याची वैयक्तिक ओळख पटेल अशी माहिती यात ठेवली जात नाही. सदस्यांच्या कुकीजचा अन्यथा वापर होत नाही.
IP address चा वापरः
संस्थळसदस्य ज्यावरून कार्यरत आहेत असे सर्व IP address संस्थळाच्या सर्व्हरमधे जमा होतात. हे सुरक्षिततेच्या कारणास्तव केले जाते. याचा उपयोग सांख्यिकी विदा जमा करण्यासाठीदेखील होऊ शकतो.
सांख्यिकी विदा:
संस्थळावरून इमेल, IP address आणि कुकीजचा वापर करून सांख्यिकी विदा आणि विश्लेषण केले जाऊ शकते; वेळोवेळी यातली काही रोचक माहिती सार्वजनिकसुद्धा केली जाऊ शकते, पण असे झाल्यास यात सदस्यांची व्यक्तिशः ओळख पटेल अशी माहिती गोपनीय ठेवली जाईल.
कायदेशीर बंधनः
कायद्याने आवश्यक असेल अशा वेळी सदस्यांची, वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती संबंधित कायदेशीर यंत्रणेला देणे आवश्यक ठरू शकते. एखाद्या न्यायालयाचा आदेश अंमलात आणणे, न्यायिक प्रक्रिया पूर्ण होणे किंवा संस्थळावर बजावण्यात आलेल्या कायदेशीर प्रक्रियेच्या नोटीशीची पूर्तता करणे, कायद्याने दिलेले हक्क शाबीत करणे किंवा त्यांचे संरक्षण करणे यासाठी आवश्यक वाटेल तेव्हा अशी वैयक्तिक माहिती संबंधितांकडे उघड केली जाईल.
लेखकांच्या विचारांशी, प्रकाशित होणाऱ्या मजकुराशी, व्यक्त झालेल्या मतांशी व्यवस्थापन, मालक, संपादक, मॉडरेटर्स सहमत असतीलच असे नाही.